Jio, Airtel, Vi : कोणचा 28 दिवसांचा प्लॅन आहे बेस्ट? जाणून घ्या

Jio, Airtel, Vi prepaid Plans
Jio, Airtel, Vi prepaid Plans

Jio, Airtel आणि Vodafone Idea चे अनेक 4G प्रीपेड प्लॅन बाजारात उपलब्ध आहेत. काही दिवसांपूर्वीच या तिन्ही कंपन्यांनी त्यांचे प्री-पेड प्लॅन्स (Pre Paid Plans) महाग केले आहेत, त्यानंतर बहुतेक लोकांना कंपन्यांच्या या नवीन प्लॅनबद्दल माहिती नाही. म्हणून आज आपण Airtel, Jio आणि Vodafone Idea च्या बेस्ट 4G प्री-पेड प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये ग्राहकांना 28 दिवसांपर्यंतची वैधता (Jio, Airtel, Vi prepaid Plans with 28 days validity) आणि त्यासोबत आणखी बरेच बेनिफिट्स मिळतात. चला जाणून घेऊया…

Reliance Jio

जिओचे काही प्लॅन आहेत ज्यात 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. पहिला प्लॅन 299 रुपयांचा आहे, ज्यामध्ये ग्राहकांना दररोज 2 GB डेटा मिळतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसचीही सुविधा आहे.

जर तुम्हाला यापेक्षा स्वस्त प्लॅन घ्यायचा असेल तर तुमच्याकडे 239 रुपयांच्या प्लॅनचा ऑप्शन आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता देखील उपलब्ध आहे, परंतु 2 GB ऐवजी तुम्हाला दररोज 1.5 GB मिळेल. 209 रुपयांचा प्लॅन आहे ज्यामध्ये दररोज 1 GB डेटा मिळतो. या प्लॅनची ​​वैधता देखील 28 दिवसांची आहे.

जर तुम्हाला जास्त डेटा हवा असेल तर तुम्ही 601 रुपयांचा रिचार्ज करू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3 जीबी डेटा मिळेल. याशिवाय या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवता येणार आहेत. या प्लॅनमध्ये 6 GB अतिरिक्त डेटा देखील मिळेल.

Jio, Airtel, Vi prepaid Plans
2021 मध्ये या स्मार्टफोन्सना मिळाली ग्राहकांची सर्वाधिक पसंती

Airtel

एअरटेलकडेही Jio सारखे 4G प्लॅन आहेत. Airtel च्या 265 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 1 GB डेटा मिळतो. दुसरा प्लॅन 299 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता, अमर्यादित कॉलिंग आणि 1.5 GB डेटा दररोज उपलब्ध आहे.

तिसरा प्लॅन 359 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. यामध्ये कॉलिंग देखील पूर्णपणे मोफत आहे. चौथा प्लॅन 599 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची ​​वैधता देखील 28 दिवसांची आहे आणि यामध्ये अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध आहे.

या सर्व प्लॅनमध्ये ग्राहकांना Amazon Prime Video चे मोबाईल सबस्क्रिप्शन मिळेल जे 30 दिवसांसाठी असेल. 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध असेल. एअरटेलचा 449 रुपयांचा 28 दिवसांचा प्लॅन देखील आहे ज्यामध्ये दररोज 2.5 GB डेटा मिळतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध आहे. एअरटेलच्या 179 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 300 फ्री मेसेज मिळतात.

Jio, Airtel, Vi prepaid Plans
देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्स; जाणून घ्या किंमत-फीचर्स

Vodafone Idea

Vodafone Idea कडे 28 दिवसांच्या वैधतेसह अनेक फ्लॅन्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 1 GB, 1.5 GB, 2 GB, 2.5 GB आणि 3 GB डेटा दररोज उपलब्ध आहे. या प्लॅनच्या किंमती अनुक्रमे 269 रुपये, 299 रुपये, रुपये 359, रुपये 409 आणि रुपये 475 आहेत. सर्व प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग देण्यात आली आहे. रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत सर्व प्लॅनसह अमर्यादित व्हिडिओ पाहता येतील.

Jio, Airtel, Vi prepaid Plans
PF खातेदारांसाठी अलर्ट; 'या' तारखेआधी ई-नॉमिनेशन करणे बंधनकारक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com