esakal | 15 हजार रुपयांत खरेदी करु शकता 'हे' बेस्ट स्मार्टफोन, पाहा यादी
sakal

बोलून बातमी शोधा

these are the best smartphone option under 15000 rupees

15 हजार रुपयांत खरेदी करु शकता 'हे' बेस्ट स्मार्टफोन, पाहा यादी

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मोबाईल कंपन्या दररोज नवीन स्मार्टफोन लॉंच करतात. या स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला दर्जेदार कॅमेरा, स्टोरेज, प्रोसेसर यासारख्या फीचर्ससह कंपन्यांकडून आता 4G नंतर 5G नेटवर्क देखील देण्यात येत आहे. ग्राहक देखील फोन खरेदी करताना चांगला कॅमेरा आणि जास्त टिकणारी बॅटरी असलेले बजेट स्मार्टफोन खरेदी करणे पसंत करतात. जर तुम्ही सुद्धा असाच स्मार्टफोन शोधत असाल तर आज आपण अशाच काही बेस्ट स्मार्टफोन ऑप्शन्स बद्दल जाणून घेणार आहोत.

सॅमसंग गॅलेक्सी एम 32 (Samsung Galaxy M32)

या सीरीजमध्ये सॅमसंगचा स्मार्टफोन गॅलेक्सी एम 32 बेस्ट ऑप्शन आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 64 GB स्टोरेज दिले आहे, तसेच या स्मार्टफोनला 64MP + 8MP + 2MP + 2MP क्वाड मेन कॅमेरा आणि 20MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देखील मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 6.4-इंच AMOLED स्क्रीन FHD रिझोल्यूशन आणि 800 Nits हाय ब्राइटनेस दिली आहे. स्मार्टफोनमध्ये कंपनीने हेलियो जी 80 ऑक्टा कोर प्रोसेसर दिला असून अॅमेझॉनवर या स्मार्टफोनची किंमत 14,999 रुपये आहे.

शाओमी रेडमी नोट 10S (Xiaomi Redmi Note 10S)

चीनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi चा स्मार्टफोन Redmi Note 10S मध्ये 6.43 इंच (16.33 सेमी) स्क्रीन 409 PPI, AMOLED 60 Hz रिफ्रेश रे दिला आहे. तसेच या स्मार्टफोनला ऑक्टा कोर (2.05 GHz, ड्युअल कोर + 2 GHz, हेक्सा कोर) मीडियाटेक हेलियो G95 प्रोसेसर सपोर्ट दिला आहे. यामध्ये तुम्हाला 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज सोबत 64 + 8 + 2 + 2 MP क्वाड प्राइमरी कॅमेरा आणि LED फ्लॅश 13 MP फ्रंट कॅमेरा मिळेल. याशिवाय यामध्ये 5000 एमएएच बॅटरी, फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. अॅमेझॉनवर या स्मार्टफोनची किंमत 14,999 रुपये आहे.

हेही वाचा: 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन, हे आहेत बेस्ट ऑप्शन

वीवो 21Y 2021 (Vivo 21Y 2021)

या स्मार्टफोनमध्ये 6.51 इंच (16.54 सेमी) 270 PPI, IPS LCD स्क्रीन दिली आहे. या व्यतिरिक्त, यात 13 एमपी + 2 एमपी ड्युअल प्राइमरी कॅमेरा आणि 8 एमपी फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनला आठ कोर (2.3 GHz, Quad Core, Cortex A53 + 1.8 GHz, Quad Core, Cortex A53 प्रोसेसर) देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन फास्ट चार्जिंग आणि 5000 एमएएच बॅटरी सपोर्टसह येतो. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 13,990 रुपयांना उपलब्ध आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम 31 एस (Samsung Galaxy M31S)

सॅमसंग स्मार्टफोन गॅलेक्सी एम 31 एस मध्ये तुम्हाला ऑक्टा-कोर (2.3 GHz, क्वाड कोर, कॉर्टेक्स A73 + 1.7 GHz, क्वाड कोर, कॉर्टेक्स A53) प्रोसेसर आणि 6.5-इंच (16.51 सेमी) 405 PPI, सुपर AMOLED 60 Hz रीफ्रेश रेट स्क्रीन दिली आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने 64 + 12 + 5 + 5 MP क्वाड प्राइमरी कॅमेरा आणि 32 MP फ्रंट कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये दिला आहे. याशिवाय 6000 एमएएच बॅटरी फास्ट रिचार्ज सपोर्टसह येते. हा स्मार्टफोन अॅमेझॉनवर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरियंट 13,649 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

हेही वाचा: स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये चालेल 120 km

रियलमी 8i (Reality 8i)

हा स्मार्टफोन 6.6 इंच (16.76 सेमी) 400 ppi, IPS LCD 120 Hz रिफ्रेश रेट स्क्रीन आणि ऑक्टा कोर (2.05 GHz, ड्युअल कोर, कॉर्टेक्स A76 + 2 GHz, हेक्सा कोर, कॉर्टेक्स A55) प्रोसेसर सोबत येतो. कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर यात 50 MP + 2 MP + 2 MP चा ट्रिपल प्राइमरी कॅमेरा आणि 16 MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएच बॅटरी दिली असून फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये आहे.

loading image
go to top