

Andhra Pradesh Set to Become First Indian State with Under-16 Social Media Ban
esakal
मोबाईल हातात असले तरी इंस्टा, यूट्यूब, फेसबुक, स्नॅपचॅट किंवा एक्स (पूर्वीचे ट्वीटर)... हे सगळ आता बंद होणार आहे. आंध्र प्रदेश सरकार लवकरच १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर कठोर बंदी घालण्याची तयारी करत आहे. हे राज्य भारतात असे पाऊल उचलणारे पहिले राज्य ठरण्याची शक्यता आहे. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला जाणार आहे.