नवीन फोन खरेदी करताय? 'या' गोष्टी नक्की पाहा, अन्यथा होईल नुकसान | Smartphone Buying Guide | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smartphone

Smartphone Buying Guide: नवीन फोन खरेदी करताय? 'या' गोष्टी नक्की पाहा, अन्यथा होईल मोठे नुकसान

Things to consider while buying a new phone: भारतीय बाजारात दरआठवड्याला वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन्स लाँच होतात. वेगवेगळ्या बजेटमध्ये येणारे असंख्य फोन्स उपलब्ध असल्याने नक्की कोणता हँडसेट खरेदी करावा हे लक्षात येत नाही. तुम्ही देखील स्वतःसाठी अथवा इतरांना गिफ्ट देण्यासाठी नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा फोन खरेदी केल्यावर पश्चाताप होऊ शकतो. फोन खरेदी करताना कोणत्या गोष्टी पाहायला हव्यात, त्याविषयी जाणून घेऊया.

हेही वाचा: Kinetic Luna: जुन्या आठवणी होणार ताज्या! ५० वर्षांनंतर नवीन अवतारात येणार 'ही' लोकप्रिय गाडी

बॅटरी आणि चार्जिंग स्पीड

सध्या बाजारात 5000mAh, 6000mAh, 7000mAh बॅटरीसह येणारे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. आपण फोनचा दिवसभर वापरत असतो. त्यामुळे पॉवरफुल बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट असणे गरजेचे आहे. तुम्हाला कमी किंमतीत दमदार बॅटरी बॅकअपसह येणारे फोन्स मिळतील. तसेच, फोन फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो की नाही हे देखील पाहा.

कॅमेरा

तुम्ही जर खास फोटोग्राफीसाठी फोन खरेदी करत असाल तर कॅमेरा सेंसर नक्की पाहा. फोन खरेदी करण्यापूर्वी कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहा. फोन सेंसरच्या रेझॉल्यूशन आणि फोकल अपर्चरबद्दल देखील जाणून घ्या. अनेक स्मार्टफोन्समध्ये ४८ मेगापिक्सल, १०८ मेगापिक्सल आणि २०० मेगापिक्सल कॅमेरा दिला जातो. मात्र, मेगापिक्सलसोबतच कॅमेऱ्याची क्वालिटी देखील पाहा.

हेही वाचा: जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

स्क्रीन आणि रिफ्रेश रेट

अनेकदा आपण फोन खरेदी करताना डिस्प्लेकडे दुर्लक्ष करतो. मात्र, डिस्प्ले फोनमधील सर्वात महत्त्वाचे फीचर आहे. ब्राइट डिस्प्ले आणि कलर्सद्वारे तुम्हाला शानदार मल्टीमीडिया अनुभव मिळेल. बहुतांश डिस्प्ले ९० हर्ट्ज आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येतात. तसेच, फुल एचडी+ AMOLED पॅनेल डिस्प्ले असेल तर अधिकच चांगले आहे.

सॉफ्टवेयर अपडेट

फोन खरेदी करताना डिव्हाइसला किती वर्ष सॉफ्टवेअर अपडेट मिळेल हे नक्की पाहा. सॅमसंग, नोकिया, गुगल, वनप्लस, मोटोरोला सारख्या कंपन्या अनेकवर्ष सॉफ्टवेअर अपडेट जारी करतात. Samsung ५ वर्ष सिस्टम आणि ४ वर्ष सिक्योरिटी अपडेट जारी केले जाते. गुगलकडून देखील वेळोवेळी अपडेट जारी केले जाते. सिस्टम अपडेटमुळे फोनमध्ये सिक्योरिटी फीचर्स मिळतात.

स्टोरेज

फोनमध्ये आपण असंख्य फोटो, व्हीडिओ आणि फाइल्स स्टोर करत असतो. कमी स्टोरेज असल्यास जास्त फाइल्स सेव्ह करता येत नाहीत. तसेच, अ‍ॅप्स वापरतानाही अडचण येते. त्यामुळे कधीही फोन खरेदी करताना जास्त रॅम आणि स्टोरेज असेल, असाच खरेदी करावा. बाजारात १२८ जीबी, २५६ जीबी स्टोरेजसह येणारे अनेक चांगले फोन्स उपलब्ध आहेत.

हेही वाचा: Fire Boltt Smartwatch: भारतीय कंपनीने लाँच केली अ‍ॅपलसारखी स्मार्टवॉच, फीचर्स खूपच जबरदस्त; किंमत कमी

टॅग्स :mobilephoneMobile Phone