Thomson QLED Launch : 24 इंचाचा QLED स्मार्ट टीव्ही फक्त 6 हजारांत! 'या' ब्रँड कंपनीने लाँच केले 3 जबरदस्त मॉडेल, पाहा एका क्लिकवर

Thomson QLED Smart TV Launch Price Features : थॉमसनने भारतात 24 इंचाचा QLED स्मार्ट टीव्ही लॉन्च केला आहे. यामध्ये प्रीमियम फिचर्ससह 32 इंच आणि 40 इंच मॉडेल्सदेखील उपलब्ध आहेत.
Thomson QLED Smart TV Launch Price Features
Thomson QLED Smart TV Launch Price Featuresesakal
Updated on

Thomson QLED Smart TV Launch : टेलिव्हिजन आणि होम अप्लायन्सेस क्षेत्रातील प्रसिद्ध ब्रँड थॉमसनने आपल्या नवीन अल्फा सिरीजमधील QLED स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केला आहे. विशेष म्हणजे, हा जगातील पहिला २४ इंच QLED स्मार्ट टीव्ही असून, तो केवळ ६७९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. बजेटमध्ये प्रीमियम अनुभव देणाऱ्या या टीव्हीबरोबरच थॉमसनने आपली होम अप्लायन्सेस मॉडेलही वाढवले असून, ५६९९ रुपये किमतीपासून सुरू होणाऱ्या एअर कूलर्सची नवीन मॉडेल सादर केली आहे.

थॉमसनच्या QLED टीव्ही सिरीजमध्ये २४-इंच मॉडलबरोबरच ३२-इंच आणि ४०-इंचचे पर्यायही उपलब्ध आहेत. हे सर्व टीव्ही अत्यंत आकर्षक डिझाइन आणि अत्याधुनिक फीचर्ससह येतात, जे घरच्या घरी थिएटरसारखा अनुभव देऊ शकतात.

थॉमसन 24 इंच QLED स्मार्ट टीव्ही फीचर्स

  • उत्तम व्हिज्युअल अनुभव आहे. या टीव्हीमध्ये १.१ अब्ज रंगसंगती असल्यामुळे चित्राचा दर्जा अत्यंत उत्कृष्ट आहे.

  • 24W स्पीकरसह हा टीव्ही उत्तम साऊंड क्वालिटी देते. तर ३२ इंच आणि ४० इंच मॉडेल्समध्ये 36W स्पीकर देण्यात आले आहेत, जे अधिक चांगला साऊंड देतात.

Thomson QLED Smart TV Launch Price Features
Whatsapp Reels Feature : खुशखबर! व्हॉट्सअ‍ॅपवर बघता येणार इंस्टाग्राम अन् फेसबुकवरचे रील्स, कसं वापरायचं नवीन फीचर? पाहा एका क्लिकवर
  • स्मार्ट कनेक्टिव्हिटी आहे. या टीव्हीमध्ये एकापेक्षा जास्त HDMI आणि USB पोर्ट्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे विविध उपकरणे सहज जोडता येतात.

  • प्री-इंस्टॉल्ड अ‍ॅप्स आहेत. यामध्ये JioCinema, YouTube, Amazon Prime Video, SonyLIV, Zee5 यांसारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सचा सपोर्ट आहे, त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंट पाहणे अधिक सुलभ होते.

  • विशेष YouTube Shorts मोड आहे. मोठ्या स्क्रीनवर शॉर्ट व्हिडिओ कंटेंटचा आनंद घेण्यासाठी खास मोड देण्यात आला आहे.

Thomson QLED Smart TV Launch Price Features
Motorola Edge 50 Offer : जबरदस्त फीचर्स अन् ब्रँड कॅमेरावाल्या Moto Edge 50 मोबाईलवर चक्क 25% डिस्काउंट, खरेदी करा एका क्लिकवर

किंमत आणि उपलब्धता

थॉमसन अल्फा सिरीज QLED स्मार्ट टीव्ही विविध स्क्रीन साईझमध्ये उपलब्ध आहेत.

२४-इंच मॉडेल: ६,७९९ रुपये

३२-इंच मॉडेल: ८,९९९ रुपये

४०-इंच मॉडेल: १२,९९९ रुपये

अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रीमियम वैशिष्ट्येफीचर्स आणि परवडणाऱ्या किमतीमुळे हे टीव्ही ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहेत. थिएटरसारखा अनुभव घरबसल्या मिळवायचा असेल, तर थॉमसनचा नवीन QLED स्मार्ट टीव्ही नक्कीच विचार करण्यासारखा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com