Threads New Feature : मस्क विकत देतोय ते फीचर मार्क झुकरबर्ग देणार फुकट; थ्रेड्स यूजर्सना होणार मोठा फायदा

Mark Zuckerberg : थ्रेड्स हे अ‍ॅप आपल्या एक्सची कॉपी असल्याचा आरोप यापूर्वीच इलॉन मस्कने केला आहे.
Threads New Feature
Threads New FeatureeSakal

इलॉन मस्कच्या 'एक्स' अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी मार्क झुकरबर्गने थ्रेड्स नावाचं अ‍ॅप लाँच केलं होतं. पहिले काही दिवस भरपूर प्रसिद्ध असलेल्या या अ‍ॅपची लोकप्रियता नंतर कमी होत गेली. मात्र, आता पुन्हा एकदा या अ‍ॅपचा वापर वाढण्याची शक्यता आहे. याला कारण म्हणजे, थ्रेड्स यूजर्सना दोन नवीन फीचर्स देण्यात येत आहेत.

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत घोषणा केली आहे. थ्रेड्समध्ये यूजर्सना लवकरच पोस्ट एडिट करण्याचा पर्याय मिळणार आहे. सोबतच, व्हॉइस नोट्सचं फीचर देखील देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एक्सवर एडिट फीचर हे केवळ सबस्क्रिप्शन असलेल्या यूजर्ससाठी उपलब्ध आहे. मात्र, थ्रेड्सवर सर्व यूजर्सना हे मिळणार आहे.

Threads New Feature
Elon Musk on COVID Vaccine : 'कोविड लसीमुळे आली होती रुग्णालयात जायची वेळ', इलॉन मस्कचा खळबळजनक दावा!

एडिट फीचरच्या माध्यमातून एखादा यूजर आपली पोस्ट अपलोड केल्यानंतर पाच मिनिटांपर्यंत ती एडिट करू शकतो. एडिट केलेल्या पोस्टच्या समोर एडिटेड असं लिहिलेलं असेल. हे अपडेट सध्या काही यूजर्सना मिळालेले असून, टप्प्या-टप्प्याने सर्वांना मिळणार आहेत. एक्सवर (ट्विटर) या फीचरसाठी यूजर्सना 900 रुपये महिना एवढे पैसे भरावे लागतात. थ्रेड्सवर मात्र हे मोफत मिळणार आहे.

ट्रेंडिंग टॉपिक्स

एक्सवर ज्याप्रमाणे ट्रेडिंग टॉपिक्स दिसतात, तसंच फीचर थ्रेड्समध्ये देण्यावर काम सुरू असल्याची माहिती मिंटने दिली आहे. एका मेटा कर्मचाऱ्याने याबाबतचा फोटो पोस्ट केल्यानंतर ही बाब समोर आली असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

Threads New Feature
Israel War : इस्राइल-हमास युद्धादरम्यान 'एक्स'ची मोठी कारवाई; चुकीची माहिती पोस्ट करणारे शेकडो अकाउंट्स ब्लॉक

थ्रेड्स हे अ‍ॅप आपल्या एक्सची कॉपी असल्याचा आरोप यापूर्वीच इलॉन मस्कने केला आहे. मार्क झुकरबर्गने एक्समधून काढलेल्या कर्मचाऱ्यांना घेऊन आपल्या अ‍ॅपची कॉपी तयार केली असं मस्कने म्हटलं होतं. आता झुकरबर्ग थ्रेड्समध्ये एक्ससारखेच फीचर्स देत असल्यामुळे मस्क यावर काय प्रतिक्रिया देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com