
MG मोटरची सिमेन्ससोबत Partnership, ग्राहकांना होणार फायदा
उत्पादकता वाढवण्यासाठी, ऊर्जा, खर्चाची बचत करण्यासाठी आणि उत्सर्जन कमी करण्यासाठी सीमेन्ससोबत भागीदारी केल्याची घोषणा एमजी मोटर इंडियाने मंगळवारी केली. या भागीदारीअंतर्गत डिजिटल टेक्नोलॉजीच्या वापराला चालना दिली जाणार. (To increase productivity and save energy mg motor india partners with siemens)
एमजी मोटर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, भागीदारीचा एक भाग म्हणून, दोन्ही कंपन्या ऊर्जा संवर्धनासाठी अत्याधुनिक डिजिटल सोल्यूशन्स विकसित करण्यात भागीदारी करतील.
हेही वाचा: Tata Nexon ही पेटली! स्कूटरनंतर आता इलेक्ट्रिक कारही धोकादायक?
एमजी मोटर इंडियाचे संचालक रवी मित्तल म्हणाले, “सीमेन्ससोबतची आमची भागीदारी औद्योगिक डिजिटायझेशन आणि इंटेलिजेंट मॅन्युफॅक्चरिंगवर केंद्रित आहे. ही भागीदारी कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी तसेच उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि ऊर्जा आणि त्यावरील खर्च आणि बचत करण्यासाठी आम्ही करार केलाय.
Web Title: To Increase Productivity And Save Energy Mg Motor India Partners With Siemens
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..