Apli PMPML App : ‘आपली पीएमपीएमएल’ अॅपवर दिसणार सर्व बस,सोबत एक खास फीचर होणार अॅड
पिंपरी, ता. २४ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसचे लाइव्ह लोकेशन, बस किती वेळेत थांब्यावर येणार, अशी सर्व माहिती प्रवाशांना ‘आपली पीएमपीएमएल’ या अॅपवर दिसणार आहे. ‘पीएमपीएमएल’च्या ॲपवर नसणाऱ्या उर्वरित ९१६ बस या अॅपला डिसेंबरपर्यंत जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसचे लोकेशन दिसणार आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून पीएमपीकडे पाहिले जाते. पीएमपीकडून १ हजार ६५० ते १ हजार ७०० बसमार्फत ३७१ मार्गांवर सेवा दिली जाते. दिवसाला साधारण १० ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात. पीएमपी बसचे लाइव्ह लोकेशन प्रवाशांना दिसावे, ऑनलाइन तिकीट काढता यावे व ऑनलाइन तक्रार करता यावी म्हणून ‘आपली पीएमपीएमएल’ हे अॅप विकसित केले होते. ते १५ ऑगस्टपासून सुरू झाले.
ही सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी आयटीएमएस सिस्टिम, बस थांब्याचे लोकेशन दाखविणारी यंत्रणा विकसित केली आहे. यासाठी १ हजार ३० पीएमपी बसमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हीटीएस) यंत्रणा बसवली आहे.
ही यंत्रणा बसवली ९१६ बसमध्ये नव्हती. त्यामुळे या बसचे लाइव्ह लोकेशन प्रवाशांना दिसत नाही. काही मार्गांवर या अॅपचा बसचे लोकेशन पाहण्यासाठी उपयोग होत नाही, अशा तक्रारी प्रवाशांच्या होत्या. मात्र त्या बसही आता ॲपवर घेतल्या जाणार असल्याची माहिती, पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.