Cyber Fraud: सावधान! तुम्हालाही येतायत 'हे' ५ मेसेज, मिनिटात रिकामे होईल बँक अकाउंट

ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सायबर गुन्हेगार फसवणुकीचे वेगवेगळे मार्ग शोधत आहेत.
Online Fraud
Online FraudSakal

Cyber Fraud Message: Cyber Fraud च्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. एक बनावट मेसेज, मेल तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो. सायबर गुन्हेगार लोकांना लुटण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत. अनेकदा सायबर गुन्हेगार आमिष दाखणारे मेसेज पाठवत असतात.

लॉटरी, डेबिट कार्ड बंद, वीज बिल यासंदर्भातील बनावट मेसेज पाठवून फसवणूक केली जाते. अशा मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यास तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. सायबर गुन्हेगार कशाप्रकारचे मेसेज पाठवतात व त्यापासून कसे सावध राहायला हवे, त्याविषयी जाणून घेऊया.

हेही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

जॉबच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक

अशा मेसेजमध्ये नोकरीचा अर्ज मंजूर झाल्याचे सांगितले जाते. तसेच, पगाराबाबत माहिती देतात. सोबत एक लिंक पाठवली जाते. या लिंकवर क्लिक केल्यावर खासगी माहिती मागितली जाते. या माहितीचा वापर करून तुमची फसवणूक केली जाऊ शकते.

बँक अकाउंट बंद करण्याच्या नावाखाली फसवणूक

या स्कॅममध्ये यूजरला बँक अकाउंट आणि कार्ड ब्लॉक करण्याची धमकी दिली जाते. यात वेगवेगळ्या बँकांचे नाव घेतले जाते. मेसेजमध्ये फिशिंग लिंक दिली जाते, ज्यावर चुकूनही क्लिक करू नये.

वीज कनेक्शन बंद करण्याचे मेसेज

वीज कनेक्शन बंद करण्याचे मेसेज सर्रास पाठवले जातात. कनेक्शन बंद करू नये यासाठी ठराविक नंबरवर कॉल करण्यास सांगितले जाते. कॉलमध्ये खासगी माहिती शेअर करण्यास सांगितले जाते. या माहितीचा वापर करून फायनेंशियल फ्रॉड केला जातो.

Online Fraud
Mahindra Car: 'कार'नामा! महिंद्राच्या 'या' गाडीने केला वर्ल्ड रेकॉर्ड, जगात ठरली नंबर-१

कर्जाच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक

कर्ज देण्याच्या नावाखाली देखील फसवणूक केली जाते. आधी यूजरला कर्ज मंजूर झाल्याचा मेसेज केला जातो. यानंतर एक लिंक पाठवून खासगी माहिती देण्यास सांगितले जाते.

कस्टम विभागाचे वापरले जाते नाव

सध्या सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी नवनवीन पद्धती शोधत आहेत. यूजरला मेसेज पाठवून त्यांचे महागडे गिफ्ट कस्टम विभागाकडून जमा असल्याचे सांगितले जाते. तसेच, गिफ्ट हवे असल्यास कस्टम ड्यूटी पे करावी लागेल, असे सांगितले जाते. एकदा पैसे दिल्यानंतर सायबर गुन्हेगार फोन उचलणे बंद करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com