esakal | भारताील टॉप बजेट कार्स, ज्या देतात दमदार सुरक्षेसह पीमियम फीचर्स

बोलून बातमी शोधा

Tata Altroz
भारतातील टॉप बजेट कार्स, ज्या देतात दमदार सुरक्षेसह पीमियम फीचर्स
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

भारतात कार खरेदी करण्यापूर्वी लोक कारचे माइलेज, फीचर्स आणि बजेटकडे लक्ष द्यायचे, पण आता कारच्या सुरक्षेविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे, त्यानंतर कार कंपन्यांनीही कारची सेफ्टी फीचर्स याकडे विशेष लक्ष देणे सुरू केले.

तुम्हालासुद्धा एखादी कार खरेदी करायची असेल आणि तुम्ही करामध्ये मायलेज, फीचर्स आणि बजेट सोबच चांगले सेफ्टी फीचर्स पाहात असाल तर आज आपण भारतातील अशा पाच कार बद्दल जाणून घेणार आहोत ज्या सेफ्टीच्या दृष्टीने अधिक चांगल्या असल्याचे सिद्ध झाल्या आहेत.

1.Tata Altroz : टाटा आपल्या वाहनांच्या मजबूतीसाठी ओळखले जात असले तरी टाटाची अल्ट्रोज ही प्रीमियम हॅचबॅक कार असून कंपनीने पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही प्रकारांमध्ये ती बाजारात आणली आहे. या कारच्या सेफ्टी फीचर्सकडे लक्ष दिल्यास कारच्या दोन्ही पुढच्या सीटवर एअर बॅग्स देण्यात आल्या आहेत.

एबीएस व्यतिरिक्त ईबीडी, मागील पार्किंग सेन्सर्स आणि स्पीड वॉर्निंग अलार्म देण्यात आले आहेत. या कारला ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार मिळाले आहेत. ही कार 5.44 लाख रुपयांच्या प्रारंभिक किंमतीवर उपलब्ध आहे.

2. Mahindra XUV300 : ही महिंद्रा कार पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह लॉन्च केली असून कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. एबीएस, चाईल्ड सीट अँकर, कॉर्नर ब्रेकिंग, फ्रंट पार्किंग सेन्सर, हिल स्टार्ट असिस्ट, सीट बेल्ट रिमाइंडर अलार्म इत्यादी सर्व अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स कारमध्ये देण्या आले आहेत. या कारला ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाली आहे. ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही 7.95 लाख रुपयांच्या प्रारंभिक किंमतीसह उपलब्ध आहे.

3. Tata Nexon : ही टाटा कार पेट्रोल आणि डिझेल दोन इंजिन प्रकारांमध्ये लॉन्च केलेली कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. कारमधील सेफ्टी फीचर्स लक्षात घेऊन कारच्या दोन्ही फ्रंट सीटवर एअरबॅग, एबीएस, ईबीडी, हिल स्टार्ट आणि हिल कंट्रोल असिस्टंट तसेच एसपी आणि ट्रॅक्शन कंट्रोल अशी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. या कारला ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाली. ही कार बाजारात 6.99 लाखांच्या प्रारंभिक किंमतीसह उपलब्ध आहे.

4 Maruti Vitara Brezza : मारुतीची विटारा ब्रेझा केवळ एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही नाही तर कंपनीच्या सर्वाधिक विक्री करणार्‍या वाहनांपैकी एक आहे. या कारमध्ये मुलांच्या आणि प्रौढांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत फीचर्स देण्यात आली आहेत. या कारला ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग मिळाली आहे. या कारची किंमत 7.34 लाख रुपये आहे.

5. Mahindra Marazzo : महिंद्राची ही कार एक बेस्ट कार आहे ज्यात मुलांच्या आणि प्रौढांसाठी प्रोटेक्शनसाठी खास फीचर्स देण्यात आलेले आहेत. यामध्ये दोन्ही समोरच्या सीटसाठी एअरबॅग, चार एबीएस चॅनेल्स तसेच एसबीआरसारखे फीचर्स आहेत. या कारला ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग मिळाली आहे तसेच या कारची किंमत 9.99 लाख रुपये आहे.