Foldable Smartphone: चक्क एवढ्या कमी किंमतीत फोल्डेबल फोन!तुमच्यासाठी कोणता बेस्ट? एकदा नक्की पाहा

Flip Fold Mobiles 2024: अगदी परवडणाऱ्या दारात मिळत आहेत या कंपनीचे फोल्डेबल मोबाईल
Best flip and fold smartphones 2024
Best flip and fold smartphones 2024esakal

Foldable Mobile : फोल्डेबल फोनची आता लोकांमध्ये एक नवी क्रेझ निर्माण झाली आहे. वाढत्या स्पर्धेमुळे अनेक कंपन्या आकर्षक फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. तुम्हीही फोल्डेबल फोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.आम्ही तुम्हाला फोल्डेबल फोनबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला बेस्ट डीलमध्ये मिळून जातील.

दोन प्रकारचे फोल्डेबल फोन :

फ्लिप-स्टाइल फोल्डेबल - हे फोन लहान, सोयीस्कर आणि तुलनेने कमी किमतीचे आहेत.

फोल्ड-स्टाइल फोल्डेबल - हे फोन वापरण्यास टॅब्लेटसारखे आहेत आणि महाग असतात.

फोल्डेबल फोनमध्ये साधारणपणे दोन स्क्रीन असतात - आतील बाजूला मोठी फोल्डेबल स्क्रीन आणि बाहेरच्या बाजूला लहान कव्हर डिस्प्ले. कव्हर डिस्प्लेवरून नोटिफिकेशन्स, कॉल आणि मेसेज पाहायला मिळतात.

फ्लिप-स्टाइल मध्ये लहान कव्हर डिस्प्ले असते तर फोल्ड-स्टाइल मध्ये मोठा कव्हर डिस्प्ले असतो.

Best flip and fold smartphones 2024
IRCTC Password Recovery : IRCTC पासवर्ड विसरलात? चिंता करू नका, 'या' दोन सोप्या मार्गांनी करा रिकव्हर

सॉफ्टवेअरही महत्वाचे!

हार्डवेअर जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे सॉफ्टवेअर आहे. सॅमसंग फोल्डेबल फोनसाठी सर्वोत्तम सॉफ्टवेअर अनुभव देण्यासाठी प्रसिद्ध आहे. फोल्ड आणि कव्हर डिस्प्लेवर अॅप कसे वर्क करतात, मल्टीटास्किंग क्षमता यासारख्या गोष्टी सॉफ्टवेअरवर अवलंबून असतात.

Best flip and fold smartphones 2024
Whatsapp Status Update : व्हॉट्सॲपने आणलंय हे भन्नाट फिचर; मोबाईल सुरु न करताच कुठूनही अपडेट करा स्टेटस,जाणून घ्या काय आहे फिचर

2024 मध्ये खरेदी करण्यासाठी काही सर्वोत्तम फोल्डेबल पर्याय

Samsung Galaxy Z Fold5 ( INR 1,54,999) - प्रॉडक्टिव्हटीसाठी उत्तम. सर्वात शक्तिशाली प्रोसेसर, अँड्रॉइड 14 आणि अनेक खास सॅमसंग वैशिष्ट्ये.

Samsung Galaxy Z Flip5 ( INR 99,999) - स्टाईलिश आणि कॉम्पॅक्ट. पाण्यापासून संरक्षित.

OnePlus Open ( INR 1,39,999) - पहिला फोल्डेबल असूनही अत्याधुनिक हार्डवेअर. शानदार कॅमेरा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com