अव्वल कॅमेरा आणि जबरदस्त प्रायव्हसी फिचर असलेला सॅमसंग गॅलेक्सी A51 आणि A71 ग्राहकांसाठी सज्ज

Top-notch camera and privacy features make the Galaxy A51 and A71 absolutely drool-worthy
Top-notch camera and privacy features make the Galaxy A51 and A71 absolutely drool-worthy

मुंबई  सध्या स्मार्टफोनमधील प्रायव्हसी काळाची गरज बनली आहे. मुद्दा प्रायव्हसीचा आहे म्हणून सॅमसंगने आपल्या ग्राहकांसाठी काही खास स्मार्टफोन तयार केले आहेत. तुमच्या स्मार्टफोनमधील प्रायव्हसी जपण्यासाठी कंपनीनं गॅलेक्सी A51 आणि A71 हे दोन स्मार्टफोन बाजारात आणलेत. या खास फोनमधील खास फिचर म्हणजे त्यातील क्विक स्विच ऑप्शन, यामाध्यमातून ग्राहकांना थेट आपल्या गॅलरीतील खासगी तसेच सार्वजनिक मोडमध्ये स्विच केलं जाऊ शकतात. याचप्रमाणे हे फिचर आवण वेब बाऊझरसाठीही वापरू शकतो. त्यामुळे मोबाईलमधील ऍप्लिकेशन आणि WhatsApp यामध्ये पटकन स्विच करता येऊ शकतं.   

पार्टनर फिचर, एचटी ब्रँड स्टुडिओ

सध्याच्या घडीला स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. ग्राहक आपला स्मार्टफोन वेगवेगळ्या कामांसाठी वापरत असतात. यामध्ये फोटो क्लिक करणे, ऑनलाईन मित्रमैत्रिणींसोबत गेम खेळणे, ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा- वेबसिरीज पाहणं, शाळा किंवा कामावरील व्हिडिओ कॉल यासाठी स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे सॅमसंगच्या नव्या फीचरमुळे स्मार्टफोन वापरणं अधिक सुलभ होते.

या सर्व गोष्टींचा विचार करुन सॅमसंग ने गॅलेक्सी A51 आणि A71 ग्राहकांसाठी बाजारात आणले आहेत. या स्मार्टफोन्समध्ये ग्राहकांच्या सर्व गरजा भागवण्यात आल्या आहेत. या स्मार्टफोनमध्ये गेमिंग, फोटो क्लिक करणे, व्यावसायिक काम पूर्ण करणे, या सुविधा उपलब्ध आहे.  सॅमसंग कंपनीच्यामते, दोन्ही स्मार्टफोन्स चांगली स्क्रीन, चांगला कॅमेरा आणि दीर्घकाळ टिकणार्‍या बॅटरी लाइफचा अनुभव देतात.

रिसर्च फर्म  स्ट्रॅटेजी अनॅलिटीक्सनुसार, गॅलेक्सी A51 हा स्मार्टफोन क्यू 2020 मध्ये जगात सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे, हे स्मार्टफोन ग्राहकांना Alt Z लाइफचा आनंद घेऊ देतात. जिथे आपले काही खासगी क्षण हे खासगीच राहतात.

प्रायव्हसी महत्त्वाची

आजच्या काळात तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमधील प्रायव्हसी खूप महत्त्वाची असते. त्यात Gen Z आणि उद्योग विश्वातील व्यक्तीच्या स्मार्टफोनमधील माहिती गुप्त राहणं महत्त्वाचं असते. त्यामुळे माहिती गुप्त ठेवेल अशा स्मार्टफोनची गरज असते. हीच गोष्ट ध्यानात घेऊन सॅमसंगनं Alt Z Life चा पर्याय सादर केला.  त्यामुळे गॅलेक्सी A51 आणि A71 आपल्या खासगीपणाबद्दल चिंता कमी करत कंपनीनं दिलेल्या जबरदस्त सर्व वैशिष्टयांचा आनंद ग्राहक घेऊ शकणार आहेत.

जेव्हा एखादा भाऊ - बहिण किंवा मित्र आपल्याला आपला स्मार्टफोन बघायला मागतो तेव्हा थोडं फार अवघडल्या सारखं होतं. कारण ते आपला स्मार्टफोन एकतर मोबाईलमधले फोटो बघण्यासाठी किंवा गेम खेळण्यासाठी मागत असतात. त्यामुळे फोन देण्यास संकोच वाटणं स्वाभाविक आहे. म्हणूनच सॅमसंगने गॅलेक्सी A51 आणि A71 या दोन्ही स्मार्टफोनमध्ये दोन वैशिष्ट्ये सादर केली आहेत. ज्यामुळे आपण आपला स्मार्टफोन कसलीच चिंता न करता कोणाच्याही हातात सोपवू शकतो.

या स्मार्टफोनमधील खास वैशिष्ट्ये म्हणजे क्विक स्विच, जे नावानुसारच काम करते. ज्यात तुम्ही गॅलरी, व्हॉट्सअॅप आणि आणखी अॅप्सला तात्काळ प्रायव्हेट मोडमध्ये स्विच करु शकता. हे काम केवळ पॉवर बटणवर डबल क्लिक केल्यानं होऊन जाते.

खरंतर, ही प्रायव्हसी सध्या खूप महत्त्वाची आहे. तसंच वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये खूप उपयुक्तही ठरते. त्यापैकी आणखी एक म्हणजे जेव्हा आपण नुकतेच शनिवार आणि रविवारच्या सुट्टीवरुन परत येत असाल आणि तुम्हाला थेट ऑफिसमध्ये जावं लागले. अशावेळी तुम्ही प्रायव्हसीमध्ये जाऊन काही विशिष्ठ चेहरे निवडा आणि फोटो प्रायव्हेट करा. उर्वरित काम AI करेल.

प्रायव्हसीची नवी कल्पना

येथे अभिनेत्री राधिका मदान आपल्याला क्विक स्विचचा कसा वापर करते हे दाखवत आहे. जेव्हा तिची बहिण (शिखा तल्सानियाने हे पात्र साकारले आहे.)  तिच्यावर काहीतरी स्नूप करण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला काही तरी वेगळं दिसते.

हा व्हिडिओ बघून झाल्यावर आता अशा प्रकारची प्रायव्हसी असलेला मोबाईल फोनचा आनंद घ्यायला कोणाला आवडणार नाही? क्विक स्विच गॅलेक्सी A51 आणि गॅलेक्सी A71 हे दोन्ही स्मार्टफोन तयार केलेल्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये सैन्य-दर्जाचा सुरक्षा स्तर सॅमसंग नॉक्सद्वारे सुरक्षित आहे.

कॅमेऱ्याची वैशिष्ट्ये

आता आपण या दोन्ही फोनच्या कॅमेऱ्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊया:

गॅलेक्सी A51 मध्ये  48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर

12-मेगापिक्सलचा वाइड-एंगल कॅमेरा

 5-मेगापिक्सल डेप्थ सेन्सर

 5-मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरासह येतो

 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे.

 गॅलेक्सी A71 मध्ये प्रायमरी - 64-मेगापिक्सेल लेन्स, 12-मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्स (123-डिग्री फील्ड व्ह्यू), 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल डेप्थ कॅमेऱ्यासह रिअर आणि सिंगल 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. 

सर्वात ठळक वैशिठ्य म्हणजे सॅमसंगनं गॅलेक्सी S20 मधील कॅमेऱ्याचे खास फिचरदेखील  गॅलेक्सी A51 आणि A71 मधील कॅमेऱ्यात देण्यात आले आहे.

सिंगल टेक: सिंगल टेक हे गॅलेक्सी S20 चे सर्वोत्कृष्ट फिचर. आता हे A51 वर उपलब्ध आहे. जेणेकरुन त्याचा आनंद ग्राहकांना घेता येईल. सिंगल टेक या फीचरमुळे 10 आणि त्यापेक्षा जास्त फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करता येतात. यात आपल्याला अचूक फोटो कसा फ्रेम करावा याबद्दल दोन वेळा विचार करण्याची गरज लागत नाही. फक्त कॅमेरा सुरु करायचा, सिंगल टेक निवडायचे आणि त्यानंतर सर्व काम आपला सब्जेकट सब्जेक्ट करत असतो. पण त्यानंतरचा रिझल्ट पाहण्यासाठी तुम्हाला गॅलरीमध्ये जाणं आवश्यक आहे. सॅमसंगचे सिंगल टेक वैशिष्ट्य उत्कृष्ट शॉट्स आणि क्षण कॅप्चर करते आणि त्या सर्वांना एका अल्बममध्ये साठवून ठेवते.

नाईट हायपोपॅरलॅप्स: हे असे वैशिष्ट्य जे लोकांना त्यांचे स्वत:चे व्हिडिओ तयार करण्याची परवानगी देते. गेल्या काही दिवसांपासून याची लोकप्रियता वाढत चालली आहे. सॅमसंगच्या नाईट हायपरलॅप्स फीचरबद्दल ग्राहक खूप आनंदी आहेत. A51 मधील हायपरलॅप्सी व्हिडिओ मध्यरात्री देखील स्पष्ट आणि चमकदार व्हिडिओ काढण्यास मदत करतात.

कस्टम फिल्टर:  वेगवेगळे रंग बदलण्यापासून बॅकग्राऊंड बदलणे, तसंच ब्लर शेड्स, यासाठी कस्टम फिल्टर हे नवीन फिचर देण्यात आले आहे.

स्मार्ट सेल्फी अँगल: जेव्हा फ्रंट कॅमेर्‍यामधून शूटिंग करताना फ्रेममध्ये एकापेक्षा जास्त लोक असतात, तेव्हा कॅमेरा आपोआप वाइड-एंगल मोडवर स्विच होईल.

क्विव व्हिडिओ:  कॅमेरा बटण दाबून ठेवण्यास तुम्ही क्विक व्हिडिओ काढू शकता. फक्त आपला स्मार्टफोन काढा, कॅमेरा बटण दाबून ठेवा आणि त्या खास क्षणांची रेकॉर्डिंग सुरू करा.

रेकॉर्डिंग करताना कॅमेरा स्विच करा:  गॅलेक्सी A51मध्ये आपल्याला रेकॉर्डिंग करताना सहजपणे फ्रंट आणि बॅक कॅमेऱ्यादरम्यान स्विच करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

AI गॅलरी झूम:  एआय गॅलरी झूमसह आपला सॅमसंग स्मार्टफोन आपल्याला कमी क्वॉलिटी असलेल्या फोटोंची क्वॉलिटी सुधारण्याची परवानगी देतो.

गॅलेक्सी A51 ची काही आणखी खास वैशिष्टये

हा फोन दोन स्वरुपात उपलब्ध आहे.

22,999 रुपयांमध्ये 6GB रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेज

24,499 रुपयांमध्ये 8GB रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेज

हा स्मार्टफोन तुम्हाला प्रिझम क्रश व्हाइट, प्रिझम क्रश ब्लॅक, प्रिझम क्रश ब्लू आणि हेझ क्रश सिल्व्हर या रंगांमध्ये उपलब्ध असेल.

A51 स्मार्टफोनला 6.5 इंचाचा सुपर एमोलेड फुल-एचडी + (1,080 x 2,400 पिक्सल) चा डिस्प्ले आहे. तसंच हा स्मार्टफोनऑक्टा-कोर एक्झिनॉक्स 9611 एसओसी द्वारा बनवण्यात आला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 4,000 mAh  आहे.

गॅलेक्सी A71 ची इतर प्रभावी वैशिष्ट्ये

गॅलेक्सी A71 हा स्मार्टफोन 6.7 इंचाचा (1,080 x 2,400 पिक्सल) इनफिनिटी-ओ सुपर एमोलेड प्लस डिस्प्लेसह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 730 ऑक्टा-कोर चिपसेटद्वारे समर्थित आहे. 8 GB रॅम आणि 128 GB रॅम असे दोन पर्याय या स्मार्टफोनसाठी उपलब्ध आहेत.  हा स्मार्टफोनची 4,500mAh बॅटरी क्षमता आहे. हा स्मार्टफोन 8GB+128GB या पर्यायात उपलब्ध असून दोन्ही पर्यायाची किंमत 29,499 आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com