Total Solar Eclipse : सूर्यग्रहणाच्या दिवशी कार अपघातात होणार वाढ; शास्त्रज्ञांनी दिला विचित्र इशारा.. काय आहे कारण?

Path of Totality : जामा इंटर्नल मेडिसिन या नियतकालिकातील रिपोर्टमध्ये हा रिसर्च प्रसिद्ध झाला आहे. युनिवर्सिटी ऑफ टोरंटोचे प्राध्यापक डॉ. डोनाल्ड रीडेल्मियर हे या रिसर्चचे सहलेखक आहेत.
Total Solar Eclipse USA
Total Solar Eclipse USAeSakal

Total Solar Eclipse 2024: 8 एप्रिल 2024 रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण अमेरिकेच्या कित्येक राज्यांमधून दिसेल. साधारणपणे सूर्यग्रहणाच्या वेळी डोळ्यांची काळजी घेण्याचा इशारा देण्यात येतो. मात्र या ग्रहणावेळी शास्त्रज्ञांनी अगदी विचित्र इशारा दिला आहे. या दिवशी रस्ते अपघातात वाढ होण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. शास्त्रज्ञांनी एका रिसर्चच्या आधारे हा विचित्र इशारा दिला आहे. जामा इंटर्नल मेडिसिन या नियतकालिकातील रिपोर्टमध्ये हा रिसर्च प्रसिद्ध झाला आहे. युनिवर्सिटी ऑफ टोरंटोचे प्राध्यापक डॉ. डोनाल्ड रीडेल्मियर हे या रिसर्चचे सहलेखक आहेत. त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली. (Solar Eclipse and Road Accidents)

2017 सालीही झाले होते अपघात

यापूर्वी 2017 साली अमेरिकेत खग्रास सूर्यग्रहण पहायला मिळाले होते. याला Great American Eclipse of 2017 असं म्हटलं जातं. या दिवशी काही काळासाठी दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली होती. या सूर्यग्रहणाच्या वेळी जमीनीच्या तब्बल 113 किलोमीटर भागावर अंधार राहिला होता. या भागात राहणाऱ्या लोकांना सर्वाधिक काळ अंधारात रहावं लागलं होतं. सुमारे अडीच ते साडेचार मिनिटांपर्यंत हा भाग काळोखात बुडाला होता. जवळपास दोन कोटी लोकांनी हा Path of Totality पाहिला.

Total Solar Eclipse USA
Baltimore Bridge collapse: अमेरिकेत जहाजाच्या धडकेने कोसळला पूल, सहा जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता; सर्व क्रू मेंबर्स होते भारतीय

अंधारात झाले नाहीत अपघात

विशेष म्हणजे, या दिवशी झालेले अपघात हे ग्रहणाच्या काळात नव्हे, तर त्याच्या आधीचा एक तास आणि नंतरचा एक तास या वेळेत घडले होते. डॉ, रीडेल्मियर आणि त्यांचे सहकारी डॉ. जॉन स्टेपल्स यांनी याबाबत माहिती दिली. एवढंच नाही, तर त्यांनी ग्रहणाच्या तीन दिवस आधीची आणि तीन दिवस नंतरची अपघातांची आकडेवारी देखील तपासली. सूर्यग्रहणाच्या नंतर अपघातांमध्ये 31 टक्के वाढ झाल्याचं यात दिसून आलं.

काय असू शकतं कारण?

या अपघातांचं नेमकं कारण शास्त्रज्ञांनाही समजलं नाही. अचानक झालेला अंधार, आणि त्यानंतर बराच काळ कमी असलेला प्रकाश यामुळे अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच कित्येक ठिकाणी सूर्यग्रहण पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केल्यामुळे ट्रॅफिक जॅम झालं होतं. यामुळे देखील अपघात झाल्याची शक्यता आहे. यावर्षी सूर्यग्रहण पाहण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com