
Fortuner Price: भारतीय ऑटोमोबाईल बाजारात टोयोटा फॉर्च्युनरने (Toyota Fortuner) गेल्या अनेक वर्षांपासून एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. केवळ एक वाहन नसून, ते एक 'स्टेटस सिम्बॉल' बनले आहे. प्रचंड स्पर्धा असूनही, फॉर्च्युनरने ग्राहकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.
भारतामध्ये फॉर्च्युनर कमालीची लोकप्रिय ठरली. भारतात गुंठामंत्र्याकडेही फॉर्च्युनर आहेत. एखाद्या प्रकल्पात जागा गेली की गावचे गाव फॉर्च्युनर गाड्या घेतात, हे आपण पाहिलेलं आहे. सध्या हगवणे प्रकरणामुळे आणि लक्ष्मण हाके प्रकरणामुळे फॉर्च्युनर पुन्हा चर्चेत आलेली आहे.