CNG Car: गुड न्युज! आता टोयोटाच्या 'या' दोन गाड्यांना मिळणार CNG चा पर्याय

 Toyota Glanza
Toyota Glanzagoogle

टोयोटा किर्लोस्कर मोटरने बुधवारी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) पॉवर सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी टोयोटाने मारुती सुझुकीसोबत करार केला होता. टोयोटा किर्लोस्कर मोटरने सांगितले की, ग्राहकांना आता ग्लान्झा (Glanza) आणि हायराइडर (Hyryder) मॉडेल्ससाठीही सीएनजी इंधनाचा पर्याय उपलब्ध असेल .याचा अर्थ कंपनीने या Glanza आणि Hyryder च्या CNG मॉडेल्सवर काम सुरू केले आहे.

या दोन्ही कारचे सीएनजी व्हेरियंट सादर केल्यामुळे इंधनाचा खर्च कमी होईल आणि ग्राहकांचे दर महिन्याला खूप पैसे वाचतील, कारण पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजीची किंमत अजूनही खूपच कमी आहे. या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेल्या टोयोटा ग्लान्झामध्ये आता मॅन्युअल ट्रान्समिशन पॉवरट्रेनसह S&G ग्रेडमध्ये CNG व्हेरिएंट असेल, असे कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

 Toyota Glanza
Affordable Smartwatch: दोन हजारात मिळणारं स्मार्टवॉच शोधाताय? भारतात लॉंच झाली 'ही' परवडणारी वॉच

Hirider मॉडेल आता S&G या दोन्ही ग्रेडमध्ये फॅक्टरी-फिट केलेल्या CNG किटसह येईल. दोन्ही ग्रेडमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन पॉवरट्रेन देखील असेल. कंपनीने घोषणा केली आहे की Hyryder चे CNG व्हेरिएंट सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक तसेच निओ ड्राइव्ह व्हेरिएंटपेक्षा वेगळे असेल. नोव्हेंबरच्या सुरुवातीला कंपनीच्या निवेदनानुसार, अर्बन क्रूझर Hyryder साठी जोरदार बुकिंग मिळत आहेत. याचा अर्थ टोयोटाची अर्बन क्रूझर Hyryder लोकांना खूप पसंत पडत आहे.

 Toyota Glanza
Vi चा 50GB फ्री डेटा अन् Sony Liv सबस्क्रिप्शनसह येणारा बेस्ट प्लॅन; जाणून घ्या किंमत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com