Toyota Battery : 10 मिनिटात फुल चार्ज अन् 1,200 किलोमीटर रेंज! इलेक्ट्रिक गाड्या धावणार सुसाट; टोयोटा बनवतंय खास बॅटरी

या बॅटरींच्या निर्मितीसाठी टोयोटाने इडेमित्सु या कंपनीशी करार केला आहे.
Toyota Solid State Battery
Toyota Solid State BatteryeSakal

सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ वाढली आहे. मात्र, असं असतानाही चार्जिंगसाठी लागणारा वेळ, आणि कमी रेंज यामुळे कित्येक लोक ईव्हींकडे पाठ फिरवत आहेत. मात्र आता ही परिस्थिती बदलणार आहे. कारण जपानी वाहन निर्माती कंपनी टोयोटा एका नव्या प्रकारची बॅटरी तयार करत आहे. ही बॅटरी तब्बल 1,200 किलोमीटर एवढी रेंज देत असल्याचं सांगण्यात येत आहे.

टोयोटाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी एक सॉलिड-स्टेट बॅटरी तयार करत आहे. ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी अवघ्या दहा मिनिटांचा वेळ लागेल. तसंच एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही तब्बल 1,200 किलोमीटर एवढी रेंज देऊ शकेल. याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, 2027-28 सालापर्यंत याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करण्यात येईल.

या बॅटरींच्या निर्मितीसाठी टोयोटाने इडेमित्सु या कंपनीशी करार केला आहे. इलेक्ट्रिक कार्स बनवणाऱ्या टेस्ला किंवा बीवायडी अशा मोठ्या कंपन्यांना पछाडण्यासाठी ही डील अगदी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. टोयोटा आधीपासूनच हायब्रिड कार सेक्टरमध्ये या दोन्ही कंपन्यांपेक्षा कित्येक पटींनी पुढे आहे. (Tech News)

Toyota Solid State Battery
EV Charging : सिग्नलवर पोहोचताच चार्ज होणार इलेक्ट्रिक कार; थांबण्याचीही गरज नाही! 'वायरलेस चार्जिंग'चा पायलट प्रोजेक्ट सुरू

सॉलिड स्टेट बॅटरी म्हणजे काय?

सध्या बाजारात सर्व इलेक्ट्रिक कार्समध्ये लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात येते. मात्र, लिथियम एक महाग पदार्थ असल्यामुळे या बॅटरींची किंमतही भरपूर वाढते. सॉलिड स्टेट बॅटरीमध्ये वापरण्यात येणारे सर्व घटक घन अवस्थेत असतात. यामुळे या बॅटरींची स्टेबिलिटी आणि सुरक्षितता वाढते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com