Voice Calling Recharge : खुशखबर! Airtel, Jio अन् Vi कंपनीने सुरू झालेत फक्त वॉइस कॉल अन् SMS रिचार्ज प्लॅन, सर्व दर पाहा एका क्लिकवर

TRAI Mandatory Rules for Voice Calling Recharge Plans Telecom Companies : TRAI च्या मार्गदर्शनानुसार, जिओ, एअरटेल आणि व्हीआयने नवीन व्हॉइस आणि एसएमएस-केवळ प्लॅन्स सादर केले आहेत. या योजनांमुळे वापरकर्त्यांना अधिक किफायतशीर पर्याय उपलब्ध होऊ शकतील.
TRAI Mandatory Rules for Voice Calling Recharge Plans Telecom Companies
TRAI Mandatory Rules for Voice Calling Recharge Plans Telecom Companiesesakal
Updated on

Voice Calling Recharge Plans : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने मोबाईल वापरकर्त्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. महागड्या डेटा पॅकची गरज नसलेल्या ग्राहकांसाठी TRAI ने फक्त कॉल आणि SMS सुविधा असलेले स्वस्त रिचार्ज प्लॅन देण्याचे निर्देश दिले होते. यानुसार Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi) ने नवीन व्हॉइस-ओनली प्लॅन्स सादर केले आहेत. हे रिचार्ज प्लॅन महिनाअखेर पर्यंत सुरू होणार आहेत.

नवीन प्लॅन्समुळे ग्राहकांना मिळणार दिलासा

गेल्या काही वर्षांपासून ग्राहकांना डेटा पॅक नको असूनही महागड्या रिचार्ज प्लॅन्स खरेदी करावे लागत होते. मात्र, आता या नवीन प्लॅन्समुळे फक्त कॉलिंग आणि SMS सुविधा घेण्याचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध झाला आहे.

Jio चे व्हॉइस-ओनली प्लॅन्स

₹458 प्लॅन-

वैधता: 84 दिवस

फायदाः सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 1000 फ्री SMS.

₹1958 प्लॅन-

वैधता: 365 दिवस

फायदाः सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 3600 फ्री SMS.

TRAI Mandatory Rules for Voice Calling Recharge Plans Telecom Companies
Royal Enfield Scram 440 Bike : रॉयल एनफिल्डने लाँच केली जबरदस्त बुलेट बाईक; स्क्रॅम 440 ची किंमत अन् लईभारी फीचर्स बघाच

Airtel चे व्हॉइस-ओनली प्लॅन्स

₹509 प्लॅन-

वैधता: 84 दिवस

फायदाः सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 900 फ्री SMS.

₹1999 प्लॅन-

वैधता: 365 दिवस

फायदाः सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 3600 फ्री SMS.

TRAI Mandatory Rules for Voice Calling Recharge Plans Telecom Companies
Whatsapp Linking Feature : व्हॉट्‌सॲपमध्ये आलं जबरदस्त फीचर; फेसबुक अन् इंस्टाग्राम युजर्ससाठी खूपच फायद्याचं, कसं वापराल? पाहा एका क्लिकवर

Vi चा व्हॉइस-ओनली प्लॅन

₹1460 प्लॅन-

वैधता: 270 दिवस

फायदाः सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 फ्री SMS.

कोणता प्लॅन आहे सर्वाधिक फायदेशीर?

Jio: कमी किंमतीत जास्त वैधता आणि SMS सुविधा मिळवणाऱ्या ग्राहकांसाठी Jio चे प्लॅन्स सर्वोत्तम आहेत.

Airtel: Airtel चे प्लॅन्स कॉलिंग आणि SMS सोबत प्रीमियम सेवा देणाऱ्या ग्राहकांसाठी योग्य आहेत.

Vi: 270 दिवसांच्या वैधतेसह, Vi चा प्लॅन नियमित रिचार्ज टाळू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी चांगला पर्याय आहे.

TRAI Mandatory Rules for Voice Calling Recharge Plans Telecom Companies
AI Technology Cancer Treatment : कर्करोगाच्या उपचारात AI चं क्रांतिकारी पाऊल; तपासणीपासून लसीकरणापर्यंत सगळंकाही ४८ तासांत, वाचा सविस्तर

TRAI च्या निर्णयाचे महत्त्व

TRAI च्या या निर्णयामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार परवडणाऱ्या प्लॅन्सचा लाभ घेता येणार आहे. डेटा प्लॅन्सची गरज नसलेल्या ग्राहकांना आता फक्त कॉल आणि SMS साठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

ग्राहकांनी त्यांच्या गरजेनुसार योग्य प्लॅन निवडून स्वस्तात सुविधा मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com