Donald Trump : ‘एआय’मध्ये अमेरिकेचेच वर्चस्व हवे : ट्रम्प, अध्यादेशावर स्वाक्षरी; नियमांमध्ये सुधारणा
Technology Leadership : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदावर येताच कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) क्षेत्रात अमेरिकेचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी एक अध्यादेश जारी केला. यामुळे अमेरिकेच्या सरकारला एआय क्षेत्रातील प्रभाव वाढवण्याची आणि सामाजिक अजेंड्यांपासून मुक्त होण्याची संधी मिळणार आहे.
वॉशिंग्टन : कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) क्षेत्रात अमेरिकेचे वर्चस्व कायम राहण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदावर येताच त्यासाठीचा अध्यादेश जारी केला.