Apache RTR 160 4V : क्रॅश अलर्ट, पार्किंग लोकेशन अन् व्हॉईस असिस्टंस.. TVS ची दमदार बाईक लाँच!

TVS New Bike : या बाईकचा खास व्हिडिओ कंपनीने काही दिवसांपूर्वी शेअर केला होता.
Apache RTR 160 4V Price
Apache RTR 160 4V PriceeSakal

TVS Apache RTR 160 4V New Version : टीव्हीएसने मोटोसोल 2023 या कार्यक्रमात आपल्या Apache RTR गाडीचं नवीन मॉडेल लाँच केलं. यामध्ये कित्येक मेकॅनिकल अपडेट्स आणि नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. ही बाईक एकाच कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आली आहे.

टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 4V या बाईकमध्ये 160cc सिंगल सिलिंडर एअर/ऑईल-कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 16.2 bhp टॉर्क जनरेट करतं. यात 5-स्पीड गिअरबॉक्स दिला आहे.

हायटेक फीचर्स

या बाईकमध्ये व्हॉईस असिस्टंस (Voice Assistance) फीचर देण्यात आलं आहे. यूजर आपला स्मार्टफोन ब्लूटूथच्या मदतीने बाईकशी कनेक्ट करू शकेल. याच्या मदतीने काही फीचर्स कंट्रोल करणं सोपं होणार आहे. या बाईकमध्ये कॉलर आयडी, SMS नोटिफिकेशन, नेव्हिगेशन असिस्ट, सर्व्हिस बुकिंग असे फीचर्सही देण्यात आले आहेत.(Hi-tech features)

सेफ्टीसाठी या बाईकमध्ये क्रॅश अलर्ट आणि लास्ट पार्किंग लोकेशन ट्रॅकर देखील देण्यात आलेला आहे. यात ड्युअल चॅनल एबीएस आणि तीन रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत. मागच्या बाजूला 240mm डिस्क ब्रेक देण्यात आलेला आहे.

Apache RTR 160 4V Price
Zulu : कायनेटिक ग्रीनची नवी इलेक्ट्रिक दुचाकी 'झुलू' बाजारात; अमेझॉन अन् फ्लिपकार्टवरुन करता येणार खरेदी

TVS Apache RTR 160 4V गाडीच्या नवीन व्हेरियंटची किंमत 1.35 लाख रुपये (एक्स शोरुम) एवढी आहे. याची बुकिंग सर्व टीव्हीएस शोरूमवर सुरू झाली असून, पुढील वर्षीपासून डिलिव्हरी सुरू करण्यात येईल. ही बाईक आपल्या सेगमेंटमधील हीरो एक्स्ट्रीम 160R आणि होंडा CB हॉर्नेट 2.0 या गाड्यांना टक्कर देईल असं म्हटलं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com