TVS चे आणखी एक स्वस्त स्कूटर लॉंच; जाणून घ्या किंमतीसह सर्वकाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tvs jupiter zx 2022 launched  with bluetooth voice assist check price mileage and all specifications

TVS चे आणखी एक स्वस्त स्कूटर लॉंच; जाणून घ्या किंमतीसह सर्वकाही

TVS Motor ने भारतात नवीन ज्युपिटर TVS ज्युपिटर ZX SmartXonnect चे नवीन टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट लॉन्च केले आहे. TVS ज्युपिटर ही Honda Activa नंतर भारतात सर्वाधिक विक्री होणारी दुसरी स्कूटर आहे. SmartXonnect आणि Voice Assist फीचर आता TVS Jupiter ZX मध्ये देण्यात आले आहे. पूर्णपणे डिजिटल कन्सोल, नेव्हिगेशन आणि व्हॉइस असिस्ट फीचरसह उपलब्ध असलेली ही एकमेव 110cc स्कूटर आहे.

110cc स्कूटर सेगमेंटमध्ये TVS ज्युपिटर ग्रांडे एडिशनसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचर सादर करणारी TVS पहिली स्कूटर आहे. SmartXonnect फीचर आता टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरियंटसाठी एक स्टँडर्ड फीचर आहे. नवीन ज्युपिटरमध्ये व्हॉइस असिस्ट, नेव्हिगेशन असिस्ट आणि एसएमएस/कॉल अलर्ट समाविष्ट आहेत.

TVS SmartXonnect प्लॅटफॉर्म हे ब्लूटूथ-एनेबल्ड टेक पेअर केलेले आहे आणि ते TVS Connect मोबाइल अॅपसह वापरले जाऊ शकते, जे Android आणि iOS दोन्हीवर उपलब्ध आहे. TVS Jupiter ZX SmartXonnect ची किंमत रु.80,973 (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. हे मॅट ब्लॅक आणि कॉपर ब्राउनसह 2 नवीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

टॅग्स :Automobile