TVS Raider 125 बाईक लॉंच, काय असेल किंमत? पाहा

TVS Raider 125
TVS Raider 125google

टू व्हिलर कंपनी टीव्हीएस मोटर्सने (TVS Motors) भारतात 125 सीसी सेगमेंटमध्ये TVS Raider 125 ही नवीन बाईक लाँच केली आहे, ही मोटारसायकल या सेगमेंटमधील सगळ्यात बेस्ट फीचर्स असेल असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे, या बाईकमध्ये रिव्हर्स एलसीडी डिजिटल स्पीडोमीटर, व्हॉइस असिस्टसह पर्यायी 5-इंच टीएफटी क्लस्टर, मल्टिपल राईड मोड्स आणि अंडर-सीट स्टोरेज सारख्या फीचर्स देण्यात आले आहेत.

फीचर्स काय आहेत?

TVS Raider125 चा लुक आणि डिझाइन बद्दल सांगायते झाल्यास या बाईकचे साईड पॅनलवर 3D लोगो देण्यात आला आहे. इंधन टाकीवर सिग्नचर प्रेसिंग हॉर्स 3 डी लोगो दिला आहे. या बाईकमध्ये यात एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेललाइट्स, एलईडी डीआरएल, एलईडी टर्न इंडिकेटर तसेच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्प्लिट सीट, डिस्क ब्रेक, ब्लॅक अलॉय व्हील्स, ट्यूबलेस टायर्स, रबर ब्रेक पेडल, अलॉय फूटपेग्स इत्यादी सुविधा दिल्या आहेत. या टीव्हीएस बाईकचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच त्याला इंटेलिगो नावाची स्टॉप-स्टार्ट सिस्टीम देण्यात आली आहे.

TVS Raider 125
टाटाची नवीन इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये धावेल 213 किमी

किंमत आणि कलर व्हेरियंट

टीव्हीएस मोटर कंपनीने आपली नवीन बाईक TVS Raider 125 ला 77,500 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) च्या किंमतीत लाँच केली आहे. बऱ्याच काळानंतर TVS ने 125 cc सेगमेंट मध्ये बाईक लाँच केली आहे. ही TVS बाईक स्ट्राइकिंग रेड, ब्लेझिंग ब्लू, विक्ड ब्लॅक आणि फायरी यलो सारख्या कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आली आहे. यात ड्रम आणि डिस्क प्रकार आहेत.

इंजिन आणि स्पीड

TVS Raider 125 मध्ये 124.8 सीसी एअर आणि ऑइल कूल्ड 3 व्ही इंजिन देण्यात आले आहे जे 7,500 rpm वर 8.37 किलोवॅट आणि 6,000 rpm वर 11.2 एनएम टॉर्क जनरेट करते. या इंजीनमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला असून, कंपनीचा दावा आहे की, ही बाईक 0-60 किमी प्रतितास स्पीड फक्त 5.9 सेकंदात धावू शकते. तसेच या बाईकची टॉप स्पीड 99 kmph पर्यंत आहे. तसेच कंफर्ट गॅस चार्ज केलेले 5 स्टेप एडजस्टेबल मोनोशॉक सस्पेंशन दिले आहेत. TVS Raider ची विशेष गोष्ट म्हणजे यात हेल्मेट रिमाइंडर आणि यूएसबी चार्जिंग सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

TVS Raider 125
Realme चा सर्वात स्वस्त 50 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन लॉंच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com