esakal | TVS Star City Plus vs Hero Splendor Plus: कोणती बाइक स्वस्त, मायलेज किती? जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

 कोणती बाइक स्वस्त, मायलेज किती? जाणून घ्या

कोणती बाइक स्वस्त, मायलेज किती? जाणून घ्या

sakal_logo
By
अक्षय साबळे

देशात सध्या इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांचा कल जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्सकडे वळला आहे. यामध्ये बजाज, हिरो, टीव्हीएस आणि होंडा सारख्या कंपन्यांच्या बाईक्सला ग्राहकांची मागणी आहे. आपणही कमी किंमत आणि जास्त मायलेज देणारी बाईक घेताना गोंधळून गेला असाल, तर आज आम्ही तुम्हाला TVS Star आणि Hero Splendor या दोन बाईक्सबद्दल माहिती देणार आहोत.

TVS Star City Plus :

TVS Star City Plus ही कंपनीची सर्वात जास्त विकणारी आणि जास्त माइलेज देणारी बाईक म्हणुन ओळखली जाते. कंपनीने याचे दोन मॉडेल बाजारात आणले आहेत. या बाईकला एयर कूल्ड ईटी-एफ आई ईको थ्रस्ट फ्यूल इंजेक्शन आधारित सिंगल सिलेंडर १०९.७ सीसी इंजिन दिले असून, जे ८.१९ PS ची पॉवर व ८.७ एनएम टॉर्क जनरेट करते. ४ गिअर असणारी ही बाईक एक लिटर पेट्रोल मध्ये ८६ किमी धावते, असा दावा कंपनीने केला आहे. ६८,४७५ ही बाईकची सुरुवातीची किंमत असून, टॉंप मॉडेलची किंमत ७०,९७५ रुपयांपर्यंत जाते.

हेही वाचा: OPPO ची धमाकेदार ऑफर; ६ कॅमेराच्या फोनवर मिळवा ३५०० रुपयांची सुट

Hero Splendor Plus :

हिरो स्प्लेंडर प्लस ही कंपनीची सर्वाधिक व्रिक्री होणारी आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बाईक आहे. कंपनीने या बाईकचे तीन मॉडेल बाजारात उतरवले आहेत. यामध्ये जे एअर कूल्ड वर आधरित सिंगल सिलेंडर ९७.२ सीसीचे इंजिन दिले आहे. जे ८.०२ PS ची पॉवर आणि ८.०५ NM टॉर्क टॉर्क जनरेट करते. ४ गिअर असणारी ही बाईक एक लिटर पेट्रोल मध्ये ८०.६ किमी धावते. कंपनीने सांगितल्यानूसार, बाईकची सुरुवातीची किंमत ६३,७५०रुपये आणि टॉप मॉडेलची किंमत ६९,५६० रुपयांपर्यंत पोहचते.

loading image
go to top