प्रत्येकाला मिळणार ब्लू टिक, ट्विटरने पुन्हा लाँच केली पेड सर्व्हिस; मोजावे लागतील 'एवढे' पैसे | Twitter Blue | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Twitter

Twitter Blue: प्रत्येकाला मिळणार ब्लू टिक, ट्विटरने पुन्हा लाँच केली पेड सर्व्हिस; मोजावे लागतील 'एवढे' पैसे

Twitter Blue Launched: अब्जाधीश एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच ४४ अब्ज डॉलर्स मोजून मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरला खरेदी केले आहे. यानंतर प्लॅटफॉर्मवर अनेक बदल पाहायला मिळत आहेत. आता कंपनीने पुन्हा एकदा आपली पेड प्रीमियम व्हेरिफिकेशन सर्व्हिस Twitter Blue ला लाँच केले आहे. कंपनीने नवीन बदल करत सर्व्हिसला रीलाँच केले आहे. कंपनीने माहिती दिलीये की, यूजर्स आता ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन खरेदी करू शकतात. यामुळे व्हेरिफाइड टिक आणि इतर फीचर्सचा फायदा घेता येईल.

हे ही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

काही दिवसांपूर्वी कंपनीने बनावट अकाउंटच्या समस्येमुळे ही सर्व्हिस बंद केली होती. परंतु, आता नवीन बदल करत ही पेड सर्व्हिस पुन्हा सुरू करण्यात आली आहे. कंपनीने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, आजपासून ट्विटर ब्लू सर्व्हिस पुन्हा एकदा सुरू करत आहोत. या सर्व्हिससाठी वेब यूजर्सला दरमहिना ८ डॉलर आणि iOS यूजर्सला दरमहिना ११ डॉलर द्यावे लागतील. सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर एडिट ट्विट, १०८०p व्हीडिओ अपलोड रीडर मोड आणि ब्लू टिकची सुविधा मिळेल.

ट्विटरने माहिती दिलीये की, यूजर्स हँडल, डिस्प्ले नाव आणि प्रोफाइल फोटो बदलू शकतात. परंतु, असे केल्यास अकाउंटवरील ब्लू टिक काढून टाकली जाईल. कंपनीकडून अकाउंट व्हेरिफाय केले जात नाही, तोपर्यंत ब्लू टिक पुन्हा मिळणार नाही. म्हणजेच, प्रोफाइल फोटो बदलल्यास ब्लू टिकसाठी पुन्हा सर्व प्रक्रिया पार पाडावी लागेल.

हेही वाचा: Social Media down: वारंवार का ठप्प होतेय Facebook, Twitter ची सेवा? जाणून घ्या यामागचे प्रमुख कारण

दरम्यान, मस्क यांच्याकडे मालकी आल्यापासून ट्विटरवर अनेक बदल पाहायला मिळत आहेत. आता तुम्हाला ब्लू टिकसाठी पैसे खर्च करावे लागतील. याआधी देखील कंपनीने पेड सबस्क्रिप्शन सर्व्हिस सुरू केली होती. परंतु, काही यूजर्सने इतरांचे नाव वापरून बनावट अकाउंट उघडले होते. यामुळ एका फार्मा कंपनीला कोट्यावधीची नुकसान झाले होते. त्यानंतर या पेड सर्व्हिसला काही कालावधीसाठी बंद करण्यात आले होते.

टॅग्स :Twitter