Twitter यूजर्सना 900 रुपयांत नेमक्या कोणत्या सुविधा देतंय? अन् आधीच्या ब्लू टीकचं काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Twitter Blue tick

Twitter यूजर्सना 900 रुपयांत नेमक्या कोणत्या सुविधा देतंय? अन् आधीच्या ब्लू टीकचं काय?

ट्विटरची blue Subscription सर्व्हिस भारतातही आज लाँच झालीय. ट्विटरच्या ब्लू टीकबाबत सोशल मीडियावर याआधी बरेच वाद विवाद झालेय. आता कंपनीने ब्लू टीकला 900 रुपये प्रति महिन्याच्या दरात लाँच केलंय. ही ऑफरसुद्धा लिमिटेड काळासाठी असल्याचेही सांगितले जातेय.

अर्थात येणाऱ्या काळात ही किंमत वाढण्याचीही शक्यता आहे. हा 900 रुपयांचा सबस्क्रिप्शन प्लान ट्विटर अँड्रॉइड आणि ट्विटर आयओएस यूजर्ससाठी आहे. वेब यूजर्ससाठी याची किंमत दरमाह 650 रुपये ठेवण्यात आली आहे. या सबस्क्रिप्शन प्लानमध्ये अनेक फिचर्सही यूजर्सना देण्यात आले आहे. चला तर हे फिचर्स नेमके कोणते असणार आहे ते जाणून घेऊया.

ट्विटर ब्लूसह यूजर्सना ट्विट एडिट करण्याचंही ऑप्शन मिळेल. यासाठी 30 मिनिटांची टाइम लिमिट देण्यात येईल. तेव्हा तुम्ही 30 मिनिटांच्या आत कुठलंही ट्विट एडिट करु शकाल. ज्यामुळे तुम्हाला तुमचं ट्विट अपडेट करता येईल. याप्रमाणे तुम्ही ट्विट एडिट करत कोणाला टॅग करु शकाल किंवा मिडिया अटॅच सुद्धा करु शकाल. यानंतर मात्र तुमच्या ट्विटला एडिटचं लेबल लागलं असेल.

Bookmark Folder

तुम्ही कुठल्याही बुकमार्कला फोल्डरमध्ये सेव्ह करुन ठेवू शकता. यासाठी तुम्हीला बुकमार्क फोल्डचा ऑप्शन मिळेल. यातून तुम्ही अनलिमिटेड बुकमार्क किंवा बुकमार्क फोल्डर क्रिएट करु शकता. यामुळे तुमचे ट्विट जास्त ऑर्गनाइज होईल. ज्यामुळे तुम्ही तुमचे फनी ट्विट्स किंवा पॉलिटीकल ट्विट्स वेगळे करुन सेव्ह करु शकाल.

टॉप आर्टिकल्स

टॉप आर्टिकल्स तुमच्या नेटवर्कमध्ये सगळ्यात जास्त शेअर केले जाणाऱ्या आर्टिकल्सचा शॉर्टकट आहे. या फिचरच्या माध्यमातून ऑटोमॅटिकली सगळ्यात जास्त शेअर केल्या जाणाऱ्या आर्टिकलला लिस्ट केल्या जाइल.

अनडो ट्विट

यूजर्सना अनडो ट्विटचं ऑप्शनदेखील ब्लू सब्सक्रिप्शनसह दिलं जाईल. यामुळे तुम्ही कुठलेही ट्विट ला ट्विटरवर व्हिजीबल होण्यापासून आधीच अनडो करु शकता. यूजर्स 4000 वर्ड्स लिमिटपर्यंत ट्विट करु शकतात.

याशिवाय तुम्ही 1080 किंवा Full HD कॉलिटीमध्ये व्हिडिओसुद्धा अपलोड करु शकता. कंपनी तुम्हाला लांबलचक व्हिडीओ पोस्ट करण्याचा सुद्धा ऑप्शन देईल. यूजर्स प्रोफाइल फोटोसह NFTही सेट करु शकता.

अनपेड ब्लू टीकचं पुढे काय?

पेड ब्लू टीक सबस्क्रिप्शन नंतर सारखा यूजर्सना आता एक प्रश्न पडतोय की अनपेड ब्लू टीकचं आता नेमकं काय होणार ते.यासंदर्भात मस्कने आधीच स्पष्टिकरण दिलंय की सगळ्यांचं ब्लू टीक काढून टाकण्यात येईल. आणि यापुढे फक्त सबस्क्रिप्शन घेणाऱ्यांनाच ब्लू टीक मिळेल.या फिचरला संपूर्णपणे अॅक्टिव्ह केल्यानंतर सगळ्यांचं अनपेड ब्लू टीक काढून टाकण्यात येईल. यासाठी काही काळ नक्कीच लागणार आहे.

मात्र त्यानंतर तुम्हाला ब्लू टीक हवं असल्यास तुम्हाला ट्विटरचं पेड सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. माहितीसाठी ट्विटर आधीच कंपनी आणि शासनाला अधिकृत खात्यांना वेगवेगळ्या टीक्स उपलब्ध करुन देणार आहेत.कंपन्यांना गोल्डन कलरचं तर शासनासंबंधित खात्यांना ग्रे कलरचा चेकमार्क येईल.