Twitter Plan
Twitter Plan esakal

Twitter Plan : एलॉन मस्कच्या निर्णयाने माध्यमांची होणार चांदी, आता ट्विटरवर बातम्या वाचण्यासाठी मोजावे लागतील पैसे

एलॉन मस्क ट्विटरवर बातम्या, लेख वाचण्यासाठी पैसे घेणार

Twitter Plan : पुढील महिन्यापासून, एलॉन मस्क ट्विटरवर बातम्या, लेख वाचण्यासाठी पैसे घेणार आहे. म्हणजेच आता प्रत्येक युजरला न्यूज कंपन्यांचा प्रत्येक लेख वाचण्याची किंमत मोजावी लागणार आहे.

Twitter Plan
Pregnancy Tips : गरोदर महिलांनी उपाशी पोटी खाऊ नयेत या गोष्टी

मस्कने ट्विटर प्लॅटफॉर्मवर आपल्या नवीन ट्विटमध्ये म्हटलंय की, आता प्रत्येक लेखाच्या आधारे युजर कडून शुल्क आकारले जाईल आणि जर त्यांनी मंथली सबस्क्रिप्शनसाठी साइन अप केलं नसेल तर त्यांना बातम्या वाचण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील.

Twitter Plan
CNG Kit For Old Cars :कारमध्ये CNG बसवल्यावर या दोन गोष्टी करा, नाहीतर...

मस्कचं नवीन ट्विटर धोरण

याआधी ट्विटरने अनेक व्हेरिफाईड अकाऊंटमधून ब्लू टिक काढून घेतली होती. शिवाय भारतातील आघाडीची वृत्तसंस्था एएनआय आणि बीबीसी यांचीही ब्लू टीक काढून घेतली होती. पण आता मस्कच्या नव्या निर्णयानुसार आता वृत्तसंस्थेला ट्विटरवरून मोठी कमाई करण्याची संधी मिळणार आहे. आणि हा न्यूज एजन्सीचा आणि त्या व्हेरिफाईड अकाऊंटचा मोठा फायदा असेल. सबस्क्रिप्शनसाठी पैसे दिले नाहीत, आता बातम्या वाचण्यासाठी मोजावे लागतील जास्त पैसे

Twitter Plan
Bones Health : या गोष्टी खाल्ल्याने हाडे होतील कमकुवत

ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन इंडियामधील वेब आवृत्तीसाठी, युजर्सना 650 रुपये मासिक शुल्क भरावे लागेल. याशिवाय, युजर्स 6,800 रुपयांचा वार्षिक प्लॅन देखील खरेदी करू शकतात. त्याच वेळी, Android आणि IOS युजर्ससाठी 900 रुपयांचा मासिक प्लॅन आहे. या दोन्ही युजर्ससाठी वार्षिक योजना 9,400 रुपये आहे. आता मस्कच्या नवीन धोरणानुसार, यापैकी कोणताही प्लॅन न घेणार्‍या यूजर्सना आता ट्विटरवरील बातम्या वाचण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com