esakal | डेस्कटॉप, मोबाइल वेब यूजर्ससाठी देखील लॉन्च झाले Twitter Spaces
sakal

बोलून बातमी शोधा

Twitter

मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरने आपल्या डेस्कटॉप आणि मोबाइल वेब वापरकर्त्यांसाठी आपले विशेष ऑडिओ संभाषन अॅप Spaces उपलब्ध करून दिले आहे. आता वेब वापरकर्ते स्पेस रूममध्ये एकमेकांशी सहजपणे कनेक्ट करु शकतील

डेस्कटॉप, मोबाइल वेब यूजर्ससाठी देखील लॉन्च झाले Twitter Spaces

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरने आपल्या डेस्कटॉप आणि मोबाइल वेब वापरकर्त्यांसाठी आपले विशेष ऑडिओ संभाषन अॅप Spaces उपलब्ध करून दिले आहे. आता वेब वापरकर्ते स्पेस रूममध्ये एकमेकांशी सहजपणे कनेक्ट करु शकतील आणि Spaces मध्ये वेगवेगळ्या विषयांवर सुरु असलेल्या चर्चांमध्ये सहभागी होऊ शकतील. (twitter spaces released for desktop and mobile web users know about it here)

ट्विटरने ट्वीट केले आहे की, वेब वापरकर्त्यांसाठी Spaces देण्यात आले आहे. आता वापरकर्ते स्पेसशी (Spaces) कनेक्ट होऊ शकतात. तसेच, वापरकर्ते ट्रान्सक्रिप्शनल डिझाइनची टेस्ट देखील घेऊ शकतात. एवढेच नाही तर, वापरकर्ते शेड्युल केलेल्या स्पेसशी कनेक्ट होण्यासाठी रिमायंडर देखील सेट करू शकतात.

अलीकडेच सुरू झालेल्या ऑडिओ चॅट अॅप क्लबहाऊस आणि ट्विटर Spaces यांच्यात चाहलीच स्पर्धा पहायला मिळणार आहे. या महिन्याच्या सुरूवातीस कंपनीने असे म्हटले आहे की सुमारे 600 आयओएस आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी स्पेस उपलब्ध करुन दिली जाईल. या व्यतिरिक्त ही कंपनी Ticketed Spaces फीचर वर काम करत आहे. त्याची चाचणी सुरू झाली आहे. हे फीचर वापरण्यासाठी वापरकर्त्याचे 1000 फॉलोअर्स असणे आवश्यक आहे.

ट्विटर ब्लू टिक

ट्विटरने काही दिवसांपूर्वी ब्लू टिक वेरिफिकेशन प्रोसेस पुन्हा सुरू केली होती. वापरकर्ते त्यांचे अकाउंट वेरिफाई करण्यासाठी अर्ज करू शकतात. 2017 मध्ये वेरिफिकेशन प्रक्रिया थांबली होती. ट्विटरने म्हटले आहे की केवळ सहा प्रकारच्या खात्यांना ब्लू टिक्स मिळतील. त्यात सरकार, कंपनी-ब्रँड, खेळ-गेमिंग, मनोरंजन, पत्रकार आणि ऑर्गेनाइजर-प्रभावशाली लोकांचा समावेश आहे. ट्विटरने पुढे म्हटले आहे की या वर्षाच्या अखेरीस आम्ही वेरिफिकेशन साठी वैज्ञानिक, शिक्षण आणि धार्मिक नेते यासारख्या श्रेणीचा समावेश करू.

ही आहे Twitter वेरिफिकेशन प्रोसेस

ट्विटरवरील आपले नाव आपले खरे नाव किंवा त्याच्याशी जुळणारे असावे. हाच नियम कंपनीच्या बाबतीतही लागू आहे.

ट्विटरवर, आपल्याला वेरिफाइड फोन नंबर, कंनफर्म केलेला ईमेल आयडी, व्यक्ती किंवा कंपनी किंवा ब्रँडबद्दल तपशीलवार माहिती द्यावी लागेल.

कंपनी, ब्रँड किंवा खाते वापरणाऱ्याचा खरा फोटो द्यावा लागेल.

वैयक्तिक खात्याच्या बाबतीत जन्मतारखेची माहिती द्यावी लागेल.

ट्विटरच्या गोपनीयता सेटिंगमध्ये पब्लिक ट्वीट्स सेट असणे गरजेचे आहे.

verification.twitter.com वर जाऊन, तुम्हाला सांगावे लागेल की तुम्ही असे काय काम करता ज्यासाठी आपले खाते व्हेरिफाय केले जावे.

शासनाने जारी केलेल्या ओळख दस्तऐवजाची स्कॅन केलेली प्रत अपलोड करणे. (उदा. वाहनचालक परवाना किंवा पासपोर्ट)

verification.twitter.com वर दिलेल्या सर्व स्टेप्स पूर्ण करा.

यानंतर, आपले खाते व्हेरिफाय झाले आहे की नाही हे सांगण्यासाठी ट्विटर आपल्याला ईमेल पाठवेल. आपले खाते व्हेरिफाय नसल्यास, 30 दिवसानंतर पुन्हा तीच प्रक्रिया पुन्हा करा.

(twitter spaces released for desktop and mobile web users know about it here)

loading image
go to top