iPhone च्या नव्या किंमतीची ट्विटरवर खिल्ली

रविवार, 16 सप्टेंबर 2018

या किंमती वरून ट्विटर युजर्सनी या नव्या आयफोनची खिल्ली उडवली आहे. अॅपलच्या लाँचिंग इव्हेंट नंतर ट्विटरवर अनेक मिम्स शेअर करण्यात आले.

अॅपलतर्फे गेल्या आठवड्यात आयफोनची 3 नवीन मॉडेल सादर करण्यात आली. iPhone XR, iPhone Xs आणि iPhone Xs Max हे अॅपलचे नवे फोन लवकरच  बाजारात उपलब्ध होणार आहेत.  यापैकी iPhone XR ची किंमत सगळ्यात कमी म्हणजे 76 हजार 900 रुपयांपासून सुरु होणार आहे. तर iPhone Xs आणि iPhone Xs Max यांच्या किंमती 1 लाख रुपयांच्या आसपास असणार आहे. 

या किंमती वरून ट्विटर युजर्सनी या नव्या आयफोनची खिल्ली उडवली आहे. अॅपलच्या लाँचिंग इव्हेंट नंतर ट्विटरवर अनेक मिम्स शेअर करण्यात आले. यापुर्वीच्या आयफोनच्या किंमती आणि या नवीन फोन्सच्या किंमती यांची तुलना करता आयफोन खरेदी करणे कसे कठिण होत चालले आहे असेही काही मिम्स शेअर करण्यात आले तर इतक्या उशीरा 'ड्युएल सिम' फोन बाजारात आणल्याबद्दलही खिल्ली उडवण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twitter user reacts on new iphone price