Elon Musk : ट्वीटरवर तुमचे फॉलोअर्स होणार कमी? मस्क मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

काही दिवसांपूर्वी मस्कने हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला होता.
Elon Musk
Elon MuskSakal

Elon Musk : टेस्लाचे सीईओ इलॉन मस्कने 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय घेतले जात आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वी मस्कने हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनेकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. मस्कच्या या निर्णयाविरोधात जगभरातून टीकेची झोड उठली होती. कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या निर्णयानंतर आता पुन्हा मस्क एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारील असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा- Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

मस्कच्या या निर्णयामुळे लाखो ट्वीटर यूजर्सवर याचा परिणाम होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मस्क येत्या काळात ट्वीटर २.० बनवण्याचा विचार करत आहे. मात्र, त्यापूर्वी मस्कने केलेल्या धक्कादायक ट्वीटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Elon Musk
Hollywood: एलॉन मस्क हाफ चायनिज! रागाच्या भरात प्रसिद्ध रॅपर हे काय बोलून गेला...

मस्कचे नेमके ट्वीट काय?

यापूर्वी घेतलेल्या मोठ्या निर्णयांनंतर आता मस्कने एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये आगामी काळात कंपनीकडून लवकरच 1.5 अब्ज (150 कोटी) ट्विटर अकाउंट डिलीट करणार असल्याचे म्हटले आहे. ज्या ट्वीटर अकाउंटवरून आतापर्यंत एकही ट्वीट किंवा अनेक वर्षांपासून लॉग इन करण्यात आलेले नाही. अशी खाती या निर्णयाअंतर्गत डिलीट केली जाणार आहेत.

ट्वीटरवर अशी अनेक खाती आहेत ज्यांनी अकाउंट ओपन केल्यानंतर केवळ एकदाच लॉग इन केले आहे. याशिवाय अनेक खात्यांवरून एकही ट्वीट करण्यात आलेले नाही. एवढेच नव्हे तर, अनेक यूजर्सना पासवर्ड लक्षात न राहिल्याने त्यांनी पुन्हा नवे खाते उघडले आहे.

Elon Musk
Elon Musk: 'तिला' ट्विटरवरुन काढायला इलॉन मस्क तयार नाही! कोण आहे ती?

मस्कची संपत्ती वाढतीच

मस्कच्या मालमत्तेत दिवसेंदिवस वाढ होत असून, फोर्ब्‍स के र‍ियल टाइम ब‍िलेन‍ियर इंडेक्‍समध्ये मस्कची संपत्ती 185 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. लवकरच ट्वीटरकडून ब्लू टिकसाठी पैसे आकारले जाणार आहे. त्यातूनही मस्कच्या संपत्तीत वाढ होणार आहे. ब्लू टिकसाठी कंपनी यूजरकडून दर महिन्याला 7 डॉलर आकारले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com