UFO in India : तामिळनाडूमधील न्यूक्लिअर प्लांटजवळ फिरतायत उडत्या तबकड्या? पोलीस अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

Tamil Nadu UFO : तामिळनाडूमधील DT Next या स्थानिक वृत्त माध्यमाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. यूएफओ ट्रॅकर सबीर हुसैन यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
UFO in India
UFO in IndiaeSakal

UFO in Tamil Nadu Nuclear Plant : परग्रहवासी जीव, म्हणजेच एलियन्स प्रवासासाठी वापरत असणाऱ्या उडत्या तबकड्या दिसल्याचे दावे जगभरात कित्येक ठिकाणी केले जातात. यावर कित्येक हॉलिवूड आणि बॉलिवूडपट देखील बनवले गेले आहेत. आता तामिळनाडूमधील एका पोलीस अधिकाऱ्याने देखील यूएफओ पाहिल्याचा दावा केला आहे.

तामिळनाडूमधील DT Next या स्थानिक वृत्त माध्यमाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. यूएफओ ट्रॅकर सबीर हुसैन (UFO Tracker Sabir) यांनी याबाबत अधिक माहिती दिली. तामिळनाडूमधील कुदंकुलम (Koodankulam) आणि तिरुनेलवेली (Tirunelveli) या दोन गावांमध्ये यूएफओ दिसले होते. या दोन्ही गावांमध्ये न्यूक्लिअर प्लांट आहेत. सब इन्स्पेक्टर कादेर यांनी हे यूएफओ पाहिले होते, आणि त्यांनी याचे दोन व्हिडिओही रेकॉर्ड केले असं या वृत्तात म्हटलं आहे. (Tamil Nadu Alien)

कित्येकांनी पाहिले यूएफओ

गेल्या वर्षी जुलै महिन्यात निवृत्त DGP प्रदीप व्ही. फिलिप यांनी देखील उडती तबकडी पाहिल्याचा दावा केला होता. यानंतर दहाच दिवसांनी आपण याठिकाणी यूएफओ पाहिल्याचा दावा सबीर हुसैन याने केला आहे. एवढंच नाही, तर इन्स्पेक्टर कादेर यांनी आपण 2020 सालापासून हे यूएफओ पाहत असल्याची माहिती डीटी नेक्स्टला दिली. (Alien/UFO in Tamil Nadu)

UFO in India
Antarctica Alien UFO : अंटार्क्टिकामध्ये दडलेत एलियन्स? गुगल मॅप्सवर यूएफओ दिसल्याच्या दाव्याने खळबळ

आता पटली खात्री

"मला आधी याबाबत जास्त कुतूहल वाटलं नव्हतं. मात्र, सबीर यांना भेटल्यानंतर आता मला 100 टक्के खात्री पटली आहे की मी ज्या गोष्टी पहायचो त्या उडत्या तबकड्याच होत्या. हे यूएफओ मध्येच हवेत थांबत होते, मध्येच झिग-झॅग पॅटर्नमध्ये हलत होते आणि अचानक गायब होत होते.." याबाबत इतर पोलीस अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com