अंडरवॉटर बिकी

प्रफुल्ल सुतार
सोमवार, 10 जुलै 2017

लीकडे वर्तमानपत्रातून आकाशातून घेण्यात आलेली ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली छायाचित्रे सर्रास प्रसिद्ध होतात. याच ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर समुद्रात पाण्याखाली देखील केला जातो. अशाच पद्धतीचा एक अंडरवॉटर ड्रोन म्हणजे बिकी. पण तो यापूर्वीच्या पाण्याखालील इतर ड्रोनपेक्षा वेगळा आहे. कारण त्याची रचना आणि पाण्यात तरंगण्याची पद्धत हुबेहुब माशासारखी आहे. १.१२ मीटर प्रतिमैल इतका याचा वेग आहे. तो इतका काही जास्त नसला तरी उत्तम छायाचित्रणासाठी पुरेसा असाच आहे. एकदाच चार्ज केलेल्या बिकीद्वारे तब्बल २ तास इतका वेळ आपण पाण्याखालील छायाचित्रण करू शकतो. 

यामध्ये फोर के तंत्रज्ञानाचा वापर असलेला कॅमेरा आहे. जो १५० डिग्रीमध्ये चित्रीकरण करू शकतो. शिवाय चित्रीकरण होत असताना कॅमेरा हलू नये, याचीही रचना यात केलेली आहे. झालेले चित्रीकरण ३२ जीबी इंटरनल स्टोरेजमध्ये साठवले जाते. शिवाय वाय-फाय तंत्रज्ञानाद्वारे अगदी लाईव्ह प्रक्षेपणही आपल्याला यातून मिळू शकते. एखादा मासा बिकीला गिळंकृत करण्याच्या प्रयत्नात असेल तेव्हा  माध्यमातून आपण त्याला नियंत्रित करू शकतो. १९६ फूट खोलीपर्यंत बिकी काम करू शकतो. शिवाय छायाचित्रण चांगले व्हावे, यासाठी एलईडी लाईटची, मार्गातील अडथळे टाळण्याची, जीपीएस, स्वतःच समतोल साधण्याची यंत्रणाही यात आहे. बिकी या उत्पादनासाठी सध्या लोकांमधून निधी गोळा केला जात आहे. तथापि, संबंधित संकेतस्थळावरून ५४९ अमेरिकन डॉलरमध्ये तुम्ही ते बुक करू शकता. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Underwear beci