UNI Pay 1/3rd Card चे लाभ जाणून घ्या; तुमची समस्या सुटेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UNI Pay 1/3rd Card

UNI Pay 1/3rd Card चे लाभ जाणून घ्या; तुमची समस्या सुटेल

देशातील अनेक कंपन्या ‘बाय नाऊ पे लेटर’ची सुविधा देत आहेत. ही संकल्पना अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. व्याजमुक्त कर्ज सुविधेअंतर्गत कोणतीही वस्तू खरेदी करून काही दिवसांनी पैसे परतफेड (problem of money) करता येते. तसेच UNI Pay 1/3rd कार्ड हे बाय नाउ पे लेटर (Buy Now Pay Later) कार्ड आहे. ज्याद्वारे एका महिन्यात केलेला खर्च तीन समान मासिक हप्त्यांमध्ये कोणत्याही व्याज किंवा शुल्काशिवाय परतफेड करू शकता.

तुम्ही एकाचवेळी पूर्ण पैसे देण्याचे ठरवले असेल तर एकूण बिलावर एक टक्का सूट किंवा कॅशबॅक मिळेल. आरबीएल बँक, स्टेट बँक ऑफ मॉरिशस आणि लिक्विलोन्स यांच्या भागीदारीत युनिऑरबिट टेक्नॉलॉजीने मागच्या वर्षी UNI Pay 1/3rd कार्ड लॉन्च केले होते. व्हिसा प्लॅटफॉर्मवर UNI Pay 1/3rd कार्ड सादर करण्यात आले आहे. व्हिसा कार्ड स्वीकारणाऱ्या सर्व ऑनलाइन वेबसाइट्स किंवा व्यापारी आउटलेटवर हे कार्ड वापरले जाऊ शकते.

हेही वाचा: नात्याला काळिमा! भाच्याने मित्रासोबत मामीवर केला सामूहिक बलात्कार

तुमचे मासिक बिल (Monthly bill) नऊ हजार रुपये आहे. इतर कोणत्याही क्रेडिट कार्डप्रमाणे तुम्ही बिल पूर्ण भरू शकता. परंतु, तुमच्याकडे कमी पैसे (problem of money) असल्यास पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्याच्या शेवटी प्रत्येकी तीन हजार रुपये भरून पैसे परत करू शकता. यासाठी कोणत्याही प्रकारचे व्याज (No Interest) किंवा अतिरिक्त शुल्क (No Additional charges) द्यावे लागणार नाही.

३१ जानेवारीनंतर आकारणार शुल्क

हे कार्ड सध्या ३१ जानेवारी २०२२ पर्यंत आजीवन मोफत आहे. त्यानंतर शुल्क आकारले जाईल. जे ग्राहक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत यूएनआय ॲप डाउनलोड करतील त्यांना आजीवन मोफत मिळेल आणि त्यानंतर नवीन ग्राहकांकडून शुल्क आकारले जाईल. यात मुदतवाढ पण दिली जाऊ शकते, असे यूएनआईचे संस्थापक आणि सीईओ नितीन गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :money