Aditya L1 : ‘आदित्य-एल वन’साठी विद्यापीठांनाही प्रशिक्षण, आयुका’ची माहिती; ‘सूट’वरील शोधकार्याला मिळणार गती

‘आदित्य’मधील ‘सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप ची (सूट) निर्मिती आयुकाने केली आहे. ‘सूट’च्या निर्मितीपासून ते त्यातील ‘डेटा’च्या विश्लेषणापर्यंत आयुकाचे शास्त्रज्ञ काम करतील.
ISRO Aditya L1 Update
ISRO Aditya L1 UpdateeSakal

‘‘आदित्य -एल वन’ ही देशाची पहिली सौरवेधशाळा ‘एल वन’ बिंदूवर पोहचली आहे. आता तिच्याकडून मोठ्या प्रमाणावर वैज्ञानिक ‘डेटा’ मिळणार आहे. या‘डेटा’च्या विश्लेषणासाठी देशभरातील विद्यापीठांना प्रशिक्षित करण्यात येईल,’’ अशी माहिती आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राच्या (IUCAA) वतीने शनिवारी देण्यात आली.

‘आदित्य’मधील ‘सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप ची (सूट) निर्मिती आयुकाने केली आहे. ‘सूट’च्या निर्मितीपासून ते त्यातील ‘डेटा’च्या विश्लेषणापर्यंत आयुकाचे शास्त्रज्ञ काम करतील. त्याचबरोबर आंतरविद्यापीठीय केंद्र असल्याने देशभरातील संशोधक विद्यार्थ्यांना खगोलीय ‘डेटा’च्या विश्लेषणासाठी प्रशिक्षण पुरविण्याची जबाबदारीही आयुकावर आहे.

डॉ. दुर्गेश त्रिपाठी म्हणाले, ‘‘आदित्य’ त्याच्या गंतव्य स्थानावर पोचल्याचा आनंद आहे. मोहिमेचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला असून, संशोधनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. ‘आदित्य’वरील सातही उपकरणे सुस्थितीत व कार्यान्वित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे लवकरच सूर्याविषयीची नवी माहिती मिळविण्यास आणि त्याचे विश्लेषण करण्यास सुरवात होईल.’’

ISRO Aditya L1 Update
Aditya L1 Mission : 'एल-1' लॅग्रेंज पॉइंटवर पोहोचला 'आदित्य'; इस्रोची ऐतिहासिक कामगिरी! पंतप्रधानांनी केली पोस्ट

‘सूट’द्वारे सूर्याची पहिली प्रतिमा मिळाली तेव्हाच हायसे वाटल्याचे अभियंता भूषण जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘सूट’ उपकरणाने पहिली प्रतिमा टिपली तेव्हा तांत्रिकदृष्ट्या आमची जबाबदारी संपली होती. पण पुढे कधीही यासंबंधी गरज भासेल तेव्हा आम्ही उपलब्ध असणार आहोत.

‘आदित्य -एल वन’ नियोजित स्थानी पोहोचल्याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. त्याच्याकडून मिळणाऱ्या ‘डेटा’वर सुरुवातीचे काही वर्षे पालक संस्थेचा अधिकार असतो. त्यानंतर तो सर्वांसाठी खुला होतो. संशोधनाबरोबरच असे मनुष्यबळ प्रशिक्षित करण्याची जबाबदारीही आयुकावर आहे.

- डॉ. आर. श्रीआनंद (संचालक, आयुका)

हे लक्षात ठेवा...

सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर हे १५ कोटी किमी. आहे. एल १ हा बिंदू पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर असल्याने आदित्य एल १ सूर्याच्या नव्हे तर पृथ्वीच्या जवळ आहे. सूर्याच्या दिशेने फक्त १० टक्के अंतर त्याने कापले आहे. पृथ्वीजवळ असल्यामुळे आदित्य एल १ ने पाठविलेला विदा जलद गतीने डाऊनलोड करता येतो. तसेच त्याच्याशी संपर्क व देवाणघेवाण वेगवान पद्धतीने होते.

ISRO Aditya L1 Update
Aditya L1 Mission : लॅग्रेंज पॉइंट काय असतात? 'आदित्य'साठी या पॉइंटवर पोहोचणं का गरजेचं आहे? जाणून घ्या

कालक्रम...

  • २ सप्टेंबर २०२३ : श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य-एल १चे प्रक्षेपण

  • ३ ते ५ सप्टेंबर २०२३ : पृथ्वीभोवती चारवेळा भ्रमण

  • १८ सप्टेंबर २०२३ : आदित्यने वैज्ञानिक विदा पाठविण्यास सुरवात.

  • १९ सप्टेंबर २०२३ : सूर्याकडील एल १ बिंदूकडे प्रयाण

  • ३० सप्टेंबर २०२३ : पृथ्वीच्या प्रभावाबाहेरील कक्षेत प्रवेश

  • १ डिसेंबर २०२३ : सोलर विंड आयन स्पेक्ट्रोमीटर (स्विस) आणि सोलर विंड पार्टिकल एक्सिपीरीमेंट कार्यान्वित झाले.

  • ८ डिसेंबर २०२३ : सूट उपकरणाद्वारे सूर्याची अतिनील तरंगलांबीतील प्रतिमा टिपली

  • ६ जानेवारी २०२४ : पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावरील एल १ बिंदूत प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com