
कुशीनगर : उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. प्रथमच राज्यातून रॉकेटद्वारे उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया यांनी भारतीय राष्ट्रीय अवकाश प्रोत्साहन आणि अधिकरण केंद्र (इन स्पेस) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्या सहयोगाने शनिवारी ही चाचणी घेतली. सायंकाळी ५.१४ वाजता रॉकेटने १.१२ किलोमीटरची उंची गाठली आणि ही चाचणी यशस्वी ठरली.