
यूपीआय पेमेंट करताना फक्त विश्वसनीय अॅप्स वापरा आणि अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
यूपीआय पिन कधीही कोणाशी शेअर करू नका आणि नियमितपणे पासवर्ड बदलत राहा.
ट्रान्झॅक्शन स्क्रीनवर रिसिव्हरचे अधिकृत नाव तपासा, फोनबुकमधील नावावर अवलंबून राहू नका.
UPI Safety Tips: सध्या ग्राहकांकडून खरेदी करताना तसेच पैशांची देवाण करताना यूपीआयचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्या अनुषंगाने फसवणुकीच्याही तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे यूपीआयच्या वापरकर्त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.