टेक्नोहंट : स्मार्टफोनचा मान्सून लॉंच

जुलैमध्ये एकापाठोपाठ एक ५ जी स्मार्टफोन लॉंच होत आहेत. शिवाय मान्सून ऑफर्समुळे तुम्हाला किमतीवर तगडी सूटही उपलब्ध होईल.
5G Smartphone
5G SmartphoneSakal

- वैभव गाटे

जुलैमध्ये एकापाठोपाठ एक ५ जी स्मार्टफोन लॉंच होत आहेत. शिवाय मान्सून ऑफर्समुळे तुम्हाला किमतीवर तगडी सूटही उपलब्ध होईल. त्यामुळे तुम्ही या महिन्यात फोन खरेदीचा विचार करत असाल, तर हा मुहूर्त खास ठरणार आहे. या महिन्यात वनप्लस, सॅमसंग, रिअलमी, आयक्यू या कंपनीचे फोन लॉन्च होत आहेत. कोणते आहेत ते फोन आपण जाणून घेऊयात.

वनप्लस नॉर्ड ३

वनप्लसची नॉर्ड सिरिज यूजर्समध्ये नेहमीच लोकप्रिय राहिली आहे. त्यामुळे वनप्लसने एकामागे एक नार्ड लॉन्च केले. यानंतर आता नॉर्ड ३ लॉन्च करण्याची तयारी वनप्लसने केली आहे. आज हा फोन लॉंच झाला. या फोनमध्ये १२० हर्ड्सचा डिस्प्ले, १.५के रिझॉल्यूशन असेल. या फोनची भारतातील किंमत साधारणः ३० हजार रुपयांपर्यंत आहे.

सॅमसंग गॅलक्सी एम ३४

सॅमसंगच्या या मॉउंस्टर सिरिज स्मार्टफोनमध्ये १२० हर्ड्सचा रिफ्रेशमेंट रेट, ६.६ इंचचा फुल एचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तर यात दोन दिवस टिकेल एवढी ६,००० एमएएचची बॅटरी आणि ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपही असेल. शिवाय यात मीडियाटेक डायमेंशन १०८० चा चिपसेट देण्यात आला असून २५ वॅटचा चार्जर देण्यात आला आहे. या फोनची किंमत २० हजार रुपयांपर्यंत असण्याचा अंदाज आहे. ७ जुलैला हा स्मार्टफोन लॉंच होऊ शकतो.

रिअलमी नार्जो ६० सिरिज

रिअलमीचा हा स्मार्टफोन १ टीबी इतक्या मोठ्या स्टोरेजसह लॉंच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या फोनमध्ये अडीच हजारहून अधिक फोटो स्टोअर होऊ शकतील. या फोनची खासियत म्हणजे यात १०० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. शिवाय यात १२० हर्ड्‌झचा कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. ६ जुलैला हा फोन लॉंच होणार आहे. भारतात नार्जो ६० आणि नार्जो ६० + हे मॉडेल एकाच दिवशी लॉंच होण्याचा अंदाज आहे. यातल्या नार्जो ६० ची किंमत १७ हजारच्या आसपास तर नार्जो ६०+ ची किंमत २२ हजार रुपयांपर्यंत असू शकते.

आयक्यू निओ ७ प्रो

फुल एचडी+ ई ५ अॅमोलेड डिस्ल्पेसह लॉंच होणारा या फोनचा डिस्प्ले ६.८ इंच आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले १२० हर्ड्‌झचा असेल. तर फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८+ जेन १ हा चिपसेट आहे. शिवाय फोनची स्टोअर २५६ जीबीची असून १२ जीबीचा रॅम असेल. ४ जुलैला हो फोन भारतात लॉंच झाला. ५ हजार एमएएचची बॅटरी असलेल्या या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. ३२,००० हजार रुपयांपासून या फोनची सुरुवात होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com