टेक्नोहंट : ‘विंडोज ११’, ‘एज’ ब्राऊझरला ‘एआय’चे पाठबळ

गुगलपाठोपाठ मायक्रोसॉफ्टही एआयवर (आर्टिशिअल इंटेलिजन्स) मोठी गुंतवणूक करत आहे. गुगलची मोठी स्पर्धक असलेल्या मायक्रोसॉफ्टने नुकतीच डेव्हलपर कॉन्फरन्स घेतली.
edge browser
edge browsersakal

- वैभव गाटे

गुगलपाठोपाठ मायक्रोसॉफ्टही एआयवर (आर्टिशिअल इंटेलिजन्स) मोठी गुंतवणूक करत आहे. गुगलची मोठी स्पर्धक असलेल्या मायक्रोसॉफ्टने नुकतीच डेव्हलपर कॉन्फरन्स घेतली. अमेरिकेतील सिॲटलमध्ये झालेल्या या कॉन्फरन्समध्ये कंपनीने नव्याने लॉन्च होत असलेल्या सेवांसाठी एआय सपोर्ट देत असल्याची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्ट आपल्या युजर्सला या वर्षात नक्की काय नवे देणार आहे, हे आपण जाणून घेऊयात.

मायक्रोसॉफ्ट ३६५ ॲप, चॅट जीपीटीसाठीचे नवे ब्राऊझर आणि विंडोज ११ मध्ये एआयचा सपोर्ट देणार असल्याचे कंपनीने कॉन्फरन्समध्ये जाहीर केले आहे. मायक्रोसॉफ्टने अमेरिकन कंपनी असलेल्या ‘ओपन एआय’मध्ये मोठी गुंतवणूक केल्यानंतर मायक्रोसॉफ्टमध्ये युजर्सना बरेच नवे फिचर्स अनुभवायला मिळतील अशी अपेक्षा होती. त्यानुसार बिंजच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्टने यावर काम करण्यास सुरुवात केली आहे.

‘एज’ ब्राऊझरमध्ये एआय

एज ब्राऊझरमध्येही एआय सपोर्ट उपलब्ध करून देणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ब्राऊझरच्या उजव्या बाजूला असलेल्या साइडबारमध्ये हा सपोर्ट दिसून येईल. शिवाय सध्या एज ब्राऊझरच्या या साइडबारमध्ये गेम, इमेज क्रिएटर, मायक्रोसॉफ्ट ३६५ असे अनेक पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्याला एआयचा सपोर्ट असेल.

‘विंडोज ११’मध्ये एआय

कंपनीने मार्च महिन्यात मायक्रोसॉफ्ट ३६५ ॲपमध्ये एआय असिस्टंटचा सपोर्ट दिला आहे. ई-मेल, प्रेजेंटेशन, डॉक्युमेंट तयार करण्यास यामुळे मदत मिळणार आहे. अशाच प्रकारचा सपोर्ट कंपनी विंडोज ११ मध्ये देण्याची तयारी करत आहे. ही एक सेंट्रलाइज एआय असिस्टंट प्रणाली असेल.

‘बिंज’ चॅट जीपीटीचा डिफॉल्ट सर्च इंजिन

चॅट जीपीटीमध्ये युजर्सना बिंजचा वापर करता येणार आहे. कारण, चॅट जीपीटीमध्ये मोठ्या गुंतवणुकीनंतर कंपनीने आता ‘बिंज’ला चॅट जीपीटीचा डिफॉल्ट ब्राऊजर बनविण्याचा निर्णय घेतला आहे. यात चॅट जीपीटी युजर्सना माहिती गोळा करून देण्यासाठी बिंज सर्चचा वापर करणार आहे. सध्या हे फिचर केवळ चॅट जीपीटी प्लसच्या युजर्सना उपलब्ध करून देण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com