टेक्नोहंट : गप्पागोष्टींचा आनंद झाला दुप्पट

व्हॉट्सॲप नवनवी ‘अपडेट्स’ आणून आपल्या युजरला खूश ठेवत असते. आता दिवाळीपूर्वीही व्हॉट्सॲपने आपल्या युजरला खास ‘गिफ्ट’ दिले आहे.
Whatsapp Group Calling
Whatsapp Group Callingsakal

- वैभव गाटे

व्हॉट्सॲप नवनवी ‘अपडेट्स’ आणून आपल्या युजरला खूश ठेवत असते. आता दिवाळीपूर्वीही व्हॉट्सॲपने आपल्या युजरला खास ‘गिफ्ट’ दिले आहे. हे गिफ्ट आहे ‘व्हॉट्सॲप ग्रुप कॉलिंग’संबंधित अपडेट. नव्या अपडेटमुळे आता युजर आपल्या ग्रुप कॉलिंगमध्ये ३१ लोकांशी कनेक्ट होऊन गप्पागोष्टींचा आनंद लुटू शकतात. त्यामुळे दिवाळीत युजरना आपल्या स्नेहीजनांना ग्रुप कॉलिंगद्वारे कनेक्ट करून भरपूर साऱ्या गप्पा मारता येणार आहेत. कंपनीचे हे लेटेस्ट अपडेट केवळ ‘आयओएस’ युजरसाठी आहे. हे अपडेट काय आहे, हे जाणून घेऊ या...

एकाच मोबाईलवर दोन व्हॉट्सॲप, व्हॉट्सॲप चॅनेल अशा काही भन्नाट फिचरचे अपडेट्स कंपनीने नुकतीच युजरला दिली आहेत. यानंतर आता आणखी एक पाऊल पुढे जात ‘मेटा’ने ‘ग्रुप कॉलिंग’ फिचरचा विस्तार केला असून, यापुढे आयओएस युजरला त्यात ३१ लोकांना कनेक्ट करता येणार आहे. हे अपडेट रोलआऊट होण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी ॲण्ड्राइड आणि आयओएस युजर्स या फिचरद्वारे केवळ १५ लोकांना कनेक्ट होऊ शकत होते. या नव्या अपडेटसाठी युजरला ॲप स्टोअरमधून व्हॉट्सॲपचे लेटेस्ट अपडेट इन्स्टॉल करावे लागेल. ॲण्ड्राइडसाठी अद्याप हे फीचर रोलआऊट करण्यात आलेले नाही; परंतु लवकरच तेही या फीचरचा आनंद घेऊ शकतील.

व्हॉट्सॲप घेणार ‘एआय’चा आधार

व्हॉट्सॲपच्या नव्या फीचरसाठी ‘मेटा’ सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) काम करत असून, कंपनी युजरला एआयवर आधारित सेवा देण्याच्या विचारात आहे. व्हॉट्सॲपवर लवकर एआय स्टिकर, एआय चॅट आणि फोटोरिअलिस्टिक इमेज जनरेशन अशी फिचर्स वापरायला मिळतील.

असा करा ग्रुप कॉल

  • ग्रुप कॉलिंग करू इच्छित असलेला ग्रुप ओपन करा.

  • ग्रुपच्या वर दिसणारे व्हॉइस कॉलचे बटन क्लिक करा.

  • ग्रुपमध्ये ३१ मेंबर ॲड असतील, तर ग्रुप कॉल त्वरित सुरू होईल.

  • ग्रुपमध्ये ३१ पेक्षा जास्त मेंबर असतील, तर युजर ज्या ३१ मेंबरना ग्रुप कॉलमध्ये ॲड करू इच्छित आहे, त्यांना ॲड करावे लागेल.

  • ३१ मेंबर ॲड केल्यानंतर ग्रुप कॉलिंग सुरू होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com