सॅमसंगची व्हॅलेंटाईन डे ऑफर, स्वस्तात खरेदी करा प्रीमीयम स्मार्टवॉच

Samsung Valentine Day Offers
Samsung Valentine Day Offers

14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनपूर्वी सॅमसंगने व्हॅलेंटाईन डे साठी खास ऑफर (Samsung Valentine Day Offers) सादर केली आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला गॅलेक्सी वॉच 4 च्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. सॅमसंग गॅलेक्सी वॉच 4 स्मार्टवॉच 9,249 रुपयांना खरेदी करता येईल. व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) च्या दिवशी आपल्या प्रियकर प्रेयसीला स्वस्तात परफेक्ट व्हॅलेंटाईन गिफ्ट देण्याची चांगली संधी ग्राहकांना मिळणार आहे.

सॅमसंग प्रॉडक्ट्सवर डिसस्काउंट (Valentine Day

स्मार्टवॉच गॅलेक्सी वॉच 4 साठी हायब्रिड लेदर बँड सॅमसंगकडून 3999 रुपयांना सवलतीत खरेदी करता येईल. याशिवाय, तुम्ही Xtreme Sports Band 999 रुपयां मध्ये खरेदी करू शकता. या सर्व इलेक्ट्रॉनिक उत्पादनांना बँकिंग ऑफरमध्ये 3000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. तसेच, सॅमसंग उत्पादनांवर 12 महिने नो कॉस्ट ईएमआय पर्याय दिला जात आहे. ही ऑफर 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत लागू असेल. सॅमसंग वेबसाइट व्यतिरिक्त, ग्राहक सॅमसंगच्या खास स्टोअरमधून ही उत्पादने खरेदी करू शकतात. Samsung Galaxy Watch 4 Fitnet Track ही बेस्ट हेल्थ आणि वेलनेस फीचर्ससह येतो. यामध्ये स्किप पॅटर्न, ब्लड ऑक्सिजनसह अनेक फीचर्स उपलब्ध आहेत.

Samsung Valentine Day Offers
मारुतीच्या ‘Baleno' ची प्रतीक्षा संपली, फक्त 11 हजारात करा बुक

Samsung Galaxy Watch 4 चे स्पेसिफिकेशन्स

Samsung च्या Galaxy Watch 4 स्मार्टवॉचमध्ये 1.4-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 450 x 450 पिक्सेल आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ v5.0 देण्यात आला आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर ते 1.18GHz वर काम करते. या स्मार्टवॉचमध्ये 1.5 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज आहे. तसेच, यात एक्सेलेरोमीटर सेन्सर, बॅरोमीटर सेन्सर, गायरो सेन्सर, जिओमॅग्नेटिक सेन्सर, लाईट सेन्सर, ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर, इलेक्ट्रिक हार्ट रेट सेन्सर आणि बायोइलेक्ट्रिकल इम्पेडन्स अॅनालिसिस सेन्सर देण्यात आले आहेत. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 361 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 40 तास काम करते. या स्मार्टवॉचमध्ये ऑन-डिमांड SpO2 ट्रॅकिंग उपलब्ध आहे, शरीर कंपोजिशन ट्रॅकर उपलब्ध आहे. यासोबतच ईसीजी आणि रक्तदाबही तपासता येतो.

Samsung Valentine Day Offers
56 दिवसांचे Jio, Airtel आणि Vi चे रिचार्ज प्लॅन, पाहा किंमत-फायदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com