esakal | नव्या कार किंवा बाईकमध्ये डिफेक्ट, थेट करा सरकारकडे तक्रार...
sakal

बोलून बातमी शोधा

नव्या कार किंवा बाईकमध्ये डिफेक्ट, थेट करा सरकारकडे तक्रार...

नव्या कार किंवा बाईकमध्ये डिफेक्ट, थेट करा सरकारकडे तक्रार...

sakal_logo
By
सुमित बागुल

Vehicle Recall Portal: केंद्र सरकारने वेहिकल रिकॉलच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. जर तुमच्या नव्या कार, बाईक किंवा कोणत्याही गाडीत मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे तर सरळ सरकारकडे याबाबत तक्रार करु शकता. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून (MoRTH) वेबसाइटवर एक रिकॉल पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर तुम्ही नव्या गाड्यांच्या डिफेक्‍टबाबत तक्रार करु शकता.

देशात सध्या वेहिकलची वॉलंटरी रिकॉल पॉलिसी आहे. ओरिजिनल इक्विमेंट मॅन्‍युफॅक्‍चररला (OEM) जेव्हा लक्षात येते की गाडीमध्ये काही फॉल्‍ट आहे, तर ते रिकॉल करु शकतात. सरकारचे हे पाऊल रिकॉल पॉलिसी अनिवार्य करण्याबाबत एक मोठे पाऊल मानले जाते आहे. कार मालकाची काही तक्रार असेल तर त्यांना डिलरशिपकडे जावे लागते पण या पोर्टलमुळे कारमालकांना दिलासा मिळेल.

हेही वाचा: शेअर बाजारात मंगलमय मंगळवार ! Sensex पहिल्यांदाच 53,500 वर

कोण करू शकते तक्रार ?

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वेबसाइटवर काही F&Q उपलब्ध आहेत. जसे की 7 वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्यांबाबत तक्रार करता येणार नाही. तुमचा मोबाइल नंबर वाहन (Vahan) डेटाबेसमध्ये असणे आवश्यक आहे. नसेल तर आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही मोबाइल नंबर रजिस्‍टर करु शकता. डिफेक्ट सुरक्षा आणि पर्यावरणाशी संबंधित आहे ना याची खातरजमा करुन मगच तक्रार करा.

कशी कराल तक्रार ?
तक्रारीसाठी सगळ्यात आधी तुम्हाला vahan.parivahan.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. मोबाईल नंबरच्या माध्यमातून लॉगइन करा. यानंतर तुमची तक्रार रजिस्‍टर करा. गाडीचा डिफेक्‍ट पाहता रिकॉल केले जाईल. तक्रारीचा तपास राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा प्रशासन करेल.

हेही वाचा: सहकारी बॅंकिंगला सावत्र वागणूक

असे कोणते डिफेक्ट आहेत ज्याची तक्रार करता येणार नाही
दररोज होणारे छोटे मोठे नुकसान, कारचालकाच्या किंवा मालकाच्या बेजबाबदारपणामुळे झालेले नुकसान, ज्या गाड्यांना फिटनेस सर्टिफिकेट लागू झाले आहे पण ते रिन्यू केले नाही, तसेच असे डिफेक्ट जे कायम दिसतात पण कारमालकाने कधीही दुरुस्ती केली नाही असे सगळे डिफेक्ट्स रिकॉल कक्षेत येत नाहीत हे ध्यानात घ्या.

क्‍लच, शॉक एब्‍सॉर्बर, बॅटरी, ब्रेक पॅड्स, एक्झॉस्‍ट सिस्‍टीम, टायर, एअर कंडीशनर आणि ऑडियो सिस्‍टीम किंवा नेव्हिगेशन सिस्‍टमसारखे इक्विपमेंट्स, ज्यांचे वेळेवर निरिक्षण, दुरुस्ती आणि रिप्‍लेसमेंटही डिफेक्‍ट्सच्या कक्षेत येत नाहीत. गंज, रंग, गाडी जास्त इंधन खाते हे सुद्धा डिफेक्ट च्या कक्षेत येत नाही.

loading image
go to top