

Vodafone-Idea (Vi) ₹3499 annual prepaid plan highlights featuring 365-day validity, 1.5GB daily data, a special 50GB extra data bonus, and "Binge All Night" benefits.
esakal
व्होडाफोन-आयडिया (Vi) कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष रिचार्ज प्लॅन आणला आहे. हा प्लॅन अशा ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे ज्यांना वारंवार रिचार्ज करण्याच्या कटकटीतून मुक्त व्हायचे आहे. एकदा हा रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना पूर्ण ३६५ दिवसांची, म्हणजेच एका वर्षाची वैधता मिळते. यामुळे ग्राहकांना थेट पुढच्या वर्षी याच तारखेला पुन्हा रिचार्ज करावा लागेल ज्यामुळे वर्षभर अखंडित सेवा सुनिश्चित होते