esakal | भारतात Vi ठरलं सर्वात वेगवान 4G नेटवर्क; Ookla ने केलं शिक्कामोर्तब
sakal

बोलून बातमी शोधा

VI Network

भारतात Vi ठरलं सर्वात वेगवान 4G नेटवर्क; Ookla ने केलं शिक्कामोर्तब

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

गेल्या वर्षभराच्या काळात जगभर कोरोनाने थैमान घातलं आहे. भारतात लॉकडाऊनच्या घोषणेला एक वर्ष पूर्ण झालं. या काळात लोकांच्या आयुष्यात मोठा बदल झालं. प्रत्यक्ष भेटी गाठींपेक्षा व्हर्च्युअल संवाद वाढला. लॉकडाऊन असल्यानं कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम दिलं. यावेळी इंटरनेट युजर्सची संख्याही प्रचंड वाढली. शाळा, महाविद्यालयांचे क्लासेस ऑनलाइन सुरु आहे तसंच वर्कशॉप्ससुद्धा केली जात आहे. वर्क फ्रॉम होम करताना नेटवर्कच्या समस्या लोकांना यायच्या. अशा काळात Vi च्या फास्टेट 4G नेटवर्कची युजर्सना मदत झाली आहे . 2020 च्या तिसऱ्या, चौथ्या आणि 2021 च्या पहिल्या तिमाहीमध्ये Vi च्या GIGAnet मुळे लोकांना फायदा झाला. सर्वात वेगवान 4G इंटरनेट सेवा देण्यात Vi चं GIGAnet पहिल्या क्रमांकावर असून यावर Ookla ने सुद्धा मोहोर उमटवली आहे.

Ookla इंटरनेट नेटवर्क स्पीड टेस्टिंग करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीने म्हटलंय की, Vi चं GIGAnet भारतात सर्वात वेगवान 4G इंटरनेट सेवा देतं. याच्या जबरदस्त अशा नेटवर्कमुळे इंटरनेटवर फाइल्स शेअरिंगचा वेगही वाढला. लाइव्ह स्ट्रिमिंग असेल किंवा व्हिडीओ कॉलची क्वालिटीसुद्धा यामुळे वाढली. विशेष म्हणजे लाइव्ह स्ट्रिमिंग, व्हिडीओ कॉलमध्ये बऱ्याचदा नेटवर्कमुळे अडथळ्याचा युजर्सना सामना करावा लागतो. मात्र Vi च्या वेगवान नेटवर्कमुळे हा अडथळा येत नाही.

Vi ही भारतातील दोन आघाडीच्या कंपन्यांच्या विलिनीकरणानंतर एक झालेली कंपनी आहे. दोन वर्षांपूर्वी कंपन्या एकत्र आल्यानंतर भारतातील अनेक राज्यात, शहरांमध्ये Vi द्वारे वेगवान इंटरनेट सेवा पुरवली जात आहे. Vi लाँच झाल्यानंतर देशात चांगलं नेटवर्क युजर्सना मिळत आहे. याचे अनुभवही काहींनी शेअर केले आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर वर्क फ्रॉम होम करताना सतत इंटरनेट कनेक्टिव्हीटीची अडचण असायची. अशावेळी Vi चे नेटवर्क जबरदस्त मिळालं. त्यातही ते सर्वात वेगवान 4G नेटवर्क असल्याचाही फायदा झाल्याचं एका युजरनं म्हटलं आहे. Ookla ने दिलेल्या माहितीमध्येही ही बाब समोर आली आहे. गेल्या वर्षीपासून सलग तिमाहीत Vi नेटवर्क हे भारतातील सर्वात वेगवान असं नेटवर्क ठरलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात जवळपास सर्वच शाळा, महाविद्यालये बंद अशावेळी ऑनलाइन क्लासेस आणि परीक्षा घेतल्या जात आहे काही ठिकाणी नेटवर्कची समस्या भासायची. याबाबत एका विद्यार्थ्यानं त्याचा अनुभव सांगितला. Vi च्या इंटरनेट सेवेचा यावेळी खूप फायदा झाला. ऑनलाइन क्लासला हजेरी लावता आली. परीक्षा कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडली. नव्या माध्यमातून शिक्षण घेत असताना Vi च्या नेटवर्क असल्यानं काही अडचण येत नाही.

विद्यार्थ्याप्रमाणे व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनाही या काळात त्यांचे काम ऑनलाइन करावे लागले. यामध्ये व्यवसायाचं ब्रँडिंग करणं, जाहिरात असेल किंवा कंपनीच्या ऑनलाइन मिटिंग यासाठी वेगवान इंटरनेटची गरज असते. एका कन्सल्टन्सी फर्मच्या कामगारांना वर्क फ्रॉम होम करत असताना Vi च्या वेगवान इंटरेनटमुळे काम सहज पूर्ण करता आलं. यावेळी क्लायंटसोबतची मिटींग किंवा ऑफिसच्या ऑनलाइन मिटिंग यामुळे सुरळीत पार पडतात असं कन्सल्टन्सीच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.

भविष्यात लोकांच्या ऑनलाइन कामाचा व्याप आणि त्यांना आवश्यक अशा सक्षम नेटवर्कची गरज लक्षात घेऊनच Vi ची उभारणी करण्यात आली आहे. त्याचा फायदा अर्थातच भारतीय ग्राहकांना मिळणार आहे. अद्ययावत नेटवर्कसाठी सर्वात मोठी सिस्टिम उभारण्यात आली आहे. कमीत कमी वेळेत आणि रिअल टाइम सेवा यामुळे युजर्सना मिळते. यामुळेच युजर्सना जेव्हा हवी तेव्हा आणि भारतात हव्या त्या ठिकाणी Vi च्या 4G सेवेचा फायदा घेता येतो.

व्होडाफोन आणि आयडीया या दिग्गज कंपन्यांचे विलिनीकरण झाल्यानंतर Vi असं नाव झालं आहे. Vi ने 4G इंटिग्रेटेड नेटवर्क म्हणजेच GIGAnet त्यांच्या युजर्ससाठी लाँच केलं. नेटवर्कच्या बाबतीत Vi हे भारतात सर्वात वेगवान 4G असल्याचं Ookla ने म्हटलं आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात डाऊनलोड आणि अपलोडिंगसाठी Vi वेगवान 4G सेवा पुरवते. तसंच देशातील प्रमुख 130 शहरांमध्ये स्पीड चार्टमध्येही Vi सर्वात पुढे आहे.

loading image