आता वर्षाला फक्त एकदाच करा रिचार्ज, ८५० जीबी डेटासह मिळेल अनलिमिटेड डेटाची सुविधा | Prepaid Recharge Plans | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vi Recharge

Prepaid Recharge Plans: आता वर्षाला फक्त एकदाच करा रिचार्ज, ८५० जीबी डेटासह मिळेल अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा

Vi Yearly Recharge Plans: टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिया आपल्या ग्राहकांसाठी अनेक शानदार प्रीपेड प्लॅन्स सादर करत आहे. जिओ आणि एअरटेलच्या तुलनेत वीआयच्या ग्राहकांची संख्या कमी झाली असली तरीही कंपनी सातत्याने नवनवीन ऑफर्सद्वारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक शानदार प्लॅन लाँच केला आहे.

वीआयने १ वर्षाच्या वैधतेसह येणारा शानदार प्रीपेड प्लॅन लाँच केला असून, या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा, कॉलिंग आणि एसएमएससह अनेक जबरदस्त बेनिफिट्स मिळतील. Vi च्या या नवीन प्लॅनविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा - वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

Vi चा नवीन रिचार्ज प्लॅन

वोडाफोन आयडियाने (Vi Recharge Plans) २,९९९ रुपये किंमतीचा शानदार रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक जबरदस्त बेनिफिट्स मिळत आहे. प्लॅनमध्ये एकूण ८५० जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनची वैधता ३६५ दिवस म्हणजेच संपूर्ण १ वर्ष आहे.

या प्लॅन अंतर्गत देशभरात सर्व नेटवर्क अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा फायदा मिळतो. याशिवाय, दररोज १०० मोफत एसएमएसची देखील सुविधा मिळते. या व्यतिरिक्त Vi Movies & TV चा देखील मोफत अ‍ॅक्सेस दिला जातो. तसेच, बिंज ऑल नाइटची सुविधा दिली जाते.

रात्रभर मोफत वापरू शकता इंटरनेट

बिंज ऑल नाइट ऑफर अंतर्गत तुम्ही रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा वापरू शकता. हा डेटा तुम्ही कोणत्याही अतिरिक्त खर्चासह वापरू शकता. ८५० जीबी डेटा समाप्त झाल्यास तुम्हाला प्रती १ एमबी डेटासाठी ५० पैसे द्यावे लागतील. दरम्यान, कंपनीकडे जास्त दिवसांच्या वैधतेसह येणारे १,४४९ रुपये, २८९९ रुपये आणि ३०९९ रुपये किंमतीचे तीन शानदार प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स देखील उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार रिचार्ज करू शकता.