Gaming Projector : गेमिंगची मजा आणखी वाढणार! भारतात लाँच होणार गेमर्ससाठी खास प्रोजेक्टर - रिपोर्ट

व्हूसॉनिकचे सीईओ जेम्स चू यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत याबाबत माहिती दिली.
Gaming Projector
Gaming ProjectoreSakal
Updated on

खऱ्या गेमर्सना माहिती आहे, की मोठ्या स्क्रीनवर गेमिंगची मजा काय असते. मात्र, मोठ्या स्क्रीनचे मॉनिटर हे तेवढेच महाग देखील असतात. मात्र, आता तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीलाच स्क्रीन करू शकणार आहात. व्हूसॉनिक कंपनी भारतात गेमर्ससाठी एक खास प्रोजेक्टर लाँच करणार आहे. हा साधारण प्रोजेक्टरपेक्षा वेगळा असणार आहे.

व्हूसॉनिकचे सीईओ जेम्स चू यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत याबाबत माहिती दिली. मोठ्या स्क्रीनवरील गेमिंगची आवड वाढावी, या उद्देशाने पुढील महिन्यात हा प्रोजेक्टर भारतात लाँच करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Gaming Projector
Mumbai Gullies : आता 'मुंबईची GTA' गेम येणार, गेमर्सना मिळणार फ्री-प्रीव्ह्यू! भारतीय गेमिंग कंपनीची मोठी घोषणा

या प्रोजेक्टरबाबत अद्याप जास्त माहिती समोर आली नाही. मात्र, ViewSonic कंपनीने गेल्या वर्षी अमेरिकेत लाँच केलेल्या Short throw X2-4K LED प्रोजेक्टर सारखाच हा नवीन प्रोजेक्टर असू शकतो, असं सांगण्यात येत आहे. याला खास गेमिंगच्या उद्देशाने तयार करण्यात आलं असून, 'एक्स बॉक्स'ला डोळ्यासमोर ठेऊन याचं डिझाईन केल्याचं म्हटलं जात आहे.

"सध्या 4G आणि 5G इंटरनेटमुळे गेमिंगचा वेग भरपूर वाढला आहे. त्यामुळे CPU आणि GPU हे नवीन पिढीच्या गेमर्ससाठी पुरेसे नाहीत. यामुळेच आम्ही 180 Hz क्षमतेचा मॉनिटर देखील लाँच केला होता. हा सध्या बाजारात उपलब्ध असणारा सर्वात वेगवान मॉनिटर आहे. तरुणांना बजेटमध्ये उत्तम गेमिंग प्रॉडक्ट्स उपलब्ध करून देणं हे आमचं उद्दिष्ट आहे." असं जेम्स चू यांनी स्पष्ट केलं.

Gaming Projector
GTA 6 : केवळ प्लेस्टेशन नाही, तर सर्वच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार जीटीए-6 गेम? रिपोर्टमध्ये मोठा दावा

भारतात उत्पादन?

आशियाची बाजारपेठ पाहता भारतावर आमचा विशेष फोकस राहणार आहे. भविष्यात भारतात मॉनिटर्सचे उत्पादन घेण्याचा आमचा विचार आहे. यादृष्टीने पावलं उचलली जात आहे. याबाबत आम्ही लवकरच अधिक माहिती देऊ, असं कंपनीचे एशिया-पॅसिफिक जनरल मॅनेजर एरिक वेई यांनी म्हटलं आहे.

पीसी गेमिंगवर भर

व्हूसॉनिक ही कंपनी गेमिंग कम्प्युटर आणि मॉनिटर्ससाठी ओळखली जाते. "आम्ही पीसी गेमिंगवर लक्ष्य केंद्रित करत आहोत. कारण, मोबाईल गेमिंगवरुन सुरुवात केल्यानंतर काही काळाने तरुण कम्प्युटरकडे वळतात असं दिसून आलं आहे. चांगला स्पीड आणि रिफ्रेश रेट देणारे मॉनिटर बनवण्याकडे आमचा कल आहे." असं व्ह्यूसॉनिक इंडियाचे मार्केटिंग आणि सेल्स डिरेक्टर संजय भट्टाचार्य यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com