Vivo V50 Elite Edition : लाँच झाला Vivo V50 सीरिजचा बजेट फोन; मिळणार 3 हजारचे ईअरबड्स फ्री; दमदार फीचर्स अन् किंमत पाहा एका क्लिकवर

Vivo V50 Elite Edition mobile launched price features : विवोने भारतात नवीन V50 Elite Edition लाँच केला आहे, ज्यामध्ये Zeiss कॅमेरे आणि मोफत TWS 3e इअरबड्सचा समावेश आहे.
Vivo V50 Elite Edition mobile launched price features
Vivo V50 Elite Edition mobile launched price featuresesakal
Updated on

Vivo V50 Elite Edition mobile deatails : प्रगत स्मार्टफोन टेक्नॉलॉजी आणि आकर्षक डिझाइनसाठी ओळखल्या जाणाऱ्या Vivo कंपनीने आपला नवीन Vivo V50 Elite Edition भारतात लाँच केला आहे. हा हायएंड स्मार्टफोन फक्त दमदार हार्डवेअरच नव्हे, तर मोफत Vivo TWS 3e वायरलेस ईअरबड्ससह येतो, त्यामुळे वापरकर्त्यांना एकाच डिव्हाइसमध्ये उत्तम परफॉर्मन्स आणि प्रीमियम ऑडिओ अनुभव मिळतो.

दमदार फीचर्स

Vivo V50 Elite Edition मध्ये 12GB RAM आणि तब्बल 512GB स्टोरेज देण्यात आले आहे. यामध्ये Qualcomm चा Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर आहे, जो मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी बेस्ट आहे.

फोनमध्ये 6.77-इंचांचा Full-HD+ क्वाड-कर्व AMOLED डिस्प्ले असून, 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 निट्स पर्यंत ब्राइटनेससह स्क्रीन अत्यंत सजीव आणि स्पष्ट दिसते.

फोटोग्राफीसाठी Zeiss

Vivo ने कॅमेरामध्येही तडजोड केली नाही. Zeiss द्वारे ट्यून केलेला 50MP + 50MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप यामध्ये देण्यात आला आहे. मुख्य सेन्सर OIS (Optical Image Stabilization) सह येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी समोर 50MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. AI आधारित फोटो एडिटिंग टूल्स, Aura Light आणि इतर फोटोग्राफी फिचर्समुळे फोटो क्लिक करणे अधिक क्रिएटिव बनते.

Vivo V50 Elite Edition mobile launched price features
Exicitel Plans : एकाच पॅकमध्ये ओटीटी + 300 टीव्ही चॅनेल्स + हायस्पीड इंटरनेट! 'या' बड्या कंपनीने सुरू केली ब्रॉडबँड धमाका ऑफर

बॅटरी आणि चार्जिंग

फोनमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी असून, ती 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. जास्तवेळ पर्यंत वापरासाठी आणि झपाट्याने चार्ज होण्यासाठी हे कॉम्बिनेशन परिपूर्ण आहे.

सॉफ्टवेअर आणि टिकाऊपणा

हा स्मार्टफोन Android 15 आधारित Funtouch OS 15 वर चालतो आणि कंपनीने 3 वर्षे OS अपडेट्स आणि 4 वर्षे सिक्युरिटी पॅचेस देण्याचे आश्वासन दिले आहे. पाण्यापासून व धूळपासून संरक्षणासाठी याला IP68 आणि IP69 सर्टिफिकेशन मिळाले आहे.

Vivo V50 Elite Edition mobile launched price features
Vivo X200 FE : परवडणाऱ्या दरात लाँच होतोय ब्रँड स्मार्टफोन Vivo X200 FE; फीचर्स, किंमतीसह सर्व डिटेल्स, पाहा एका क्लिकवर

Vivo TWS 3e वायरलेस ईअरबड्स मोफत

या फोनसोबत Vivo TWS 3e ही वायरलेस इअरबड्स जोडी मोफत मिळते. यामध्ये 11mm ड्रायव्हर्स, 30dB Active Noise Cancellation, AI कॉल नॉइस रिडक्शन आणि 88ms लो-लेटेंसी गेमिंग मोड यांसारखी प्रगत फिचर्स आहेत. एकदा चार्ज केल्यावर 42 तासांपर्यंत संगीताचा आनंद घेता येतो.

किंमत आणि ऑफर्स

Vivo V50 Elite Edition ची किंमत 41,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन Rose Red रंगात Amazon, Flipkart आणि निवडक ऑफलाइन स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन खरेदीदारांसाठी HDFC, SBI आणि Axis Bank कार्ड्सवर 3,000 रुपयेपर्यंत कॅशबॅक किंवा एक्सचेंज बोनसचा पर्याय उपलब्ध आहे. ऑफलाइन खरेदीदारांसाठीही विविध बँक ऑफर्ससह Vivo चा V-upgrade एक्सचेंज प्रोग्रॅम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com