

Vivo Y600 with 10,000mAh Battery & 50MP Camera: Specs & Launch
esakal
Vivo Y600 Massive Battery Phone: स्मार्टफोन बाजारात खळबळ उडवून देण्यासाठी टेक ब्रँड विव्हो (Vivo) आपला एक अत्यंत दमदार आणि नवा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. Vivo Y600 असे या आगामी फोनचे नाव असून, यातील तब्बल 10,000mAh क्षमतेची महाकाय ब्ल्यूव्होल्ट (BlueVolt) बॅटरी हे या फोनचे सर्वात मोठे मुख्य आकर्षण ठरत आहे. विशेष म्हणजे, लाँचिंगपूर्वीच या फोनने आपल्या पॉवरफुल बॅटरीबॅकअपच्या जोरावर थेट 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' (Guinness World Records) मध्ये आपले नाव नोंदवले आहे.