फुल चार्जमध्ये 600 किमी धावणारी इलेक्ट्रिक SUV कार लॉन्च; वाचा काय आहेत फीचर्स

कंपनीने लॉन्च केलेली ही तिसरी इलेक्ट्रिक कार आहे
Volvo SUV EX90 SUV
Volvo SUV EX90 SUVsakal
Updated on

Volvo ने आपली नवीन SUV EX90 SUV सादर केली आहे. ही 7 सीट सुपर युटिलिटी इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीने लॉन्च केलेली ही तिसरी इलेक्ट्रिक कार आहे, जे कंपनीच्या Volvo XC90 सारखेच आहे. स्वीडिश कंपनीने यापूर्वी XC40 रिचार्ज आणि C40 रिचार्ज लॉन्च केले होते. Volvo EX90 SUV बाबत कंपनीने सांगितले आहे की, त्याची विक्री 2024 पासून सुरू होईल.

हेही वाचा : गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

व्होल्वो EX90 SUV चे डिझाइन

Volvo EX90 SUV च्या डिझाईनबद्दल सांगायचे तर ही कार रिचार्जवर चालणारी आहे. यात व्होल्वोचे सुप्रसिद्ध डिझाईन आहेत जसे की थोर हॅमर हेडलाइट्स, ब्लँक ऑफ ग्रिल इ. कारमध्ये फ्लश डोअर हँडल देण्यात आले आहेत. यात 22 इंच स्पोक अलॉय व्हील्स आहेत. मागील डिझाइनकडे पाहता, यात C-आकाराच्या एलईडी युनिटसह टेल लॅम्प डिझाइन आहे. एसयूव्ही 5,037 मिमी लांब आहे, जी XC90 पेक्षा थोडी जास्त आहे. पण रुंदी थोडी कमी.

Volvo EX90 SUV चे इंटिरियर डिझाइन

Volvo EX90 चे इंटीरियर डिझाईन पाहता यात 14.5-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे. वाहनात 5G कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. आवाजासाठी या एसयूव्हीमध्ये डॉल्बी अॅटमॉसचाही सपोर्ट देण्यात आला असून हेडरेस्टमध्ये स्पीकर बसवण्यात आले आहेत. स्मार्टफोनच्या मदतीने गाडी नियंत्रित केले जाऊ शकते. कंपनीचे म्हणणे आहे की, कार बनवताना 15% रिसायकल केलेले स्टील वापरले गेले आहे. यामध्ये सुमारे 48 किलो रिसायकल प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. कारमध्ये वापरल्या जाणार्‍या एकूण प्लास्टिकपैकी हे 15% आहे.

Volvo SUV EX90 SUV
Scheduled Message On WhatsApp : आता गर्लफ्रेंडला शेड्यूल करून द्या 'बर्थ डे'च्या शुभेच्छा

Volvo EX90 SUV इंजिन, रेंज आणि पॉवर

EX90 SUV मध्ये कंपनीने दोन-मोटर सेटअप दिला आहे. इंजिन 408 bhp पॉवर आणि 770Nm टॉर्क निर्माण करते. परफॉर्मन्स मॉडेल्समध्ये, ते 517 bhp आणि 910Nm टॉर्क देते. कारच्या चारही चाकांना पॉवर दिली आहे. कार 180 किमी/तास वेगाने धावू शकते. यात 111 kWh ची लिथियम-आयन बॅटरी आहे जी एका चार्जवर 600 किमीपर्यंत जाऊ शकते. यात 250 kW पर्यंत DC फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. ज्याच्या मदतीने 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 180 किमीपर्यंत जाऊ शकते. कंपनीचे म्हणणे आहे की, बॅटरी 0 ते 80% पर्यंत चार्ज होण्यासाठी फक्त अर्धा तास लागतो.

व्होल्वो ही नवीनतम इलेक्ट्रिक कार कंपनीच्या म्हणण्यानुसार खूपच सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या बाबतीत जास्तीत जास्त सुरक्षितता देण्याचा कंपनीचा दावा आहे. याशिवाय कारमध्ये लिडर नावाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. ज्यामुळे चांगला ड्रायव्हिंग अनुभव मिळतो आणि सुरक्षितता सुनिश्चित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com