Technology : इतरांच्या आधी मोबाईलवर नवीन गेम खेळण्यासाठी प्ले स्टोअरवर सेटिंग कशी कराल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Technology : इतरांच्या आधी मोबाईलवर नवीन गेम खेळण्यासाठी प्ले स्टोअरवर सेटिंग कशी कराल?

Technology : इतरांच्या आधी मोबाईलवर नवीन गेम खेळण्यासाठी प्ले स्टोअरवर सेटिंग कशी कराल?

Android वापरकर्ते Google Play Store ला जाऊन लॉन्च न झालेल्या गेमसाठी प्री रजिस्टर करू शकतात. खेळाडूंना प्री रजिस्टरवर फायदे मिळतात आणि काही गेम बक्षिसे देतात. मोबाईल गेम खेळणे खूप जणांना आवडते; त्यामुळे ते कोणता नवीन गेम येणार आहे याच्या शोधात असतात, त्यांच्यासाठी प्री रजिस्टरची सोपी प्रोसेस.

जसे आपण कॉम्प्युटरवर किंवा कन्सोलवर गेम लॉन्च होण्याआधी प्री रजिस्टर करून खेळू शकतो आता ते android फोन मध्ये शक्य झाले आहे. फोनवर गेम लॉन्च होण्यापूर्वी रजिस्टर करू शकता. हे केले की गेम लॉन्च होताच फोनवर आपोआप इंस्टॉल होईल आणि गेमिंग सर्वात आधी करू शकाल.

हेही वाचा: Video Viral : स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठी 102 वर्षीय वृद्धाने काढली चक्क वरात, काय आहे कारण?

गेमसाठी प्री रजिस्टर करण्याचे अनेक फायदे आहेत

१. तुम्हाला नवीन गेम्स बाकिंच्या आधी खेळता येतील.

२. अनेक गेम्स प्री रजिस्टर करणाऱ्यांना प्ले स्टोअर कडून विशेष ऑफर आणि बक्षिसे मिळतात.

३. मोबाईलवर गेमची साइज जास्त नसते आणि प्री रजिस्टरचा पर्याय विनामूल्य आहे.

प्ले स्टोअरवर प्री रजिस्टर कसं करावं

Android वापरकर्त्यांसाठी Play Store ला जाऊन गेमसाठी प्री रजिस्टर करणे खूप सोपे आहे, प्रोसेससाठी खालील स्टेप्सने जाऊ शकतात.

  • तुमच्या Android फोनवर Google Play Store उघडा.

  • आता सगळ्यात खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला 'प्री रजिस्टर गेम' विभाग दिसेल.

  • प्री रजिस्टर विभागाशेजारी दिसणार्‍या बाणावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला त्या गेमची यादी दिसेल ज्यासाठी तुम्ही प्री रजिस्टर करू शकतात.

  • तुम्हाला ज्या गेमसाठी प्री रजिस्टर करायचे आहे त्यावर क्लिक करा.

  • गेमच्या नावा शेजारी दिसणार्‍या प्री रजिस्टर बटणावर क्लिक करा. असे केल्यावर तुम्हाला एक पॉप-अप दिसेल, तिथून 'इंस्टॉल व्हेन अव्हेलेबल' हा पर्याय निवडा.

  • अशा प्रकारे, गेम लॉन्च होण्याआधीच, तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर कोणता गेम इंस्टॉल करायचा हे ठरवू शकाल.

  • Google Play Store वर नवीन गेम सतत येत असतात, त्यामुळे तुम्ही प्री रजिस्टर विभागात जाऊन त्यांची अपडेट केलेली यादी तपासू शकता.

हेही वाचा: सासरी गेल्यानंतर सासूचे मन जिंकण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स वापरा..

Web Title: Wanna Play New Games Before Others Follow Playstore Easy Steps

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..