esakal | वॉशिंग मशीन  खरेदी करण्यापूर्वी  जाणून घ्या लेटेस्ट टेक्नोलॉजी
sakal

बोलून बातमी शोधा

वॉशिंग मशीन खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या लेटेस्ट टेक्नोलॉजी

वॉशिंग मशीन मध्ये खुप सारे ब्रँड आणि ऑप्शन्स आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला वॉशिंग मशीनच्या टेक्नॉलॉजी विषय सांगणार आहोत.

वॉशिंग मशीन खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या लेटेस्ट टेक्नोलॉजी

sakal_logo
By
अर्चना बनगे

वॉशिंग मशीन खरं तर प्रत्येक घराची गरज असते. यामुळे गृहिणींचे, वर्कर वुमन चे काम सोपे होते. मार्केटमध्ये वॉशिंग मशीन अनेक प्रकारची असतात. जसे की सेमी ऑटोमॅटिक , फुल्ली ऑटोमॅटिक, फ्रेंड लोडिंग वॉशिंग मशीन. यामध्ये   खूप अशा टेक्नॉलॉजीचा वापर केलेला असतो. Twinwash, Flexwash, EcoBubble, o2 Wash, Drum Technology आदि. चला तर जाणून घेऊया नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी.

TwinWash and FlexWash

जेव्हा तुम्ही फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन खरेदी करता तेव्हा टॉप लोडर्स आणि फ्रंट लोडर्स या दोन्हीच्या मध्ये कन्फ्युजन होऊ शकता. मात्र सॅमसंग नी या समस्या वर एक पर्याय काढला आहे. तो म्हणजे FlexWash. FlexWash आधुनिक मशीन डिझाईन आहे. हे मशीन हायब्रीड डिझाईन असल्याने दोन्ही बाजूला लोड घेऊन काम करू शकते.अशा प्रकारच्या मशीन मध्ये मेन फ्रंट लोडर मशीन असते. त्याची कॅपॅसिटी 21 किलोग्राम असते.लोडरला कमी कपॅसिटी सोबत वापरता येऊ शकते. याचबरोबर एलजीने अशाच प्रकारच्या कन्सेप्ट वरती काम केले आहे याचं नाव डुअल लोड आहे.

EcoBubble and o2 Wash

सॅमसंग आणि आईएफबी या दोघांनी मिळून एक टेक्निक डेव्हलप केली आहे. ज्यामध्ये बबल्सच्या मदतीने कपडे स्वच्छ करण्यास मदत मिळते .कपडे डॅमेज होत नाहीत. सॅमसंग EcoBubble टेक्नॉलॉजी च्या मदतीने बबल्स तयार करतात. या टेक्निक मध्ये डिटर्जंट पार्टिकल ला बबल्समध्ये बदलले जाते. ज्यामुळे हे बबल्स कपडे स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. याच प्रकारे IFB कंपनीने o2 wash चा असाच वापर केला आहे. यामध्ये एअर बबल्स तयार केले आहेत. जे कपडे स्वच्छ करण्यास मदत करतात.

Motion DD and WaveMotion

वॉशिंग मशीन कंपनीने वेगवेगळ्या प्रकारचे वॉश मोशन टेक्निक्स विकसित केल्या आहेत. जे वेगवेगळ्या कपड्याच्या प्रकारानुसार स्वच्छ करण्यास मदत करतात. एलजी मध्ये 6 मोशन डी डी टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. Tumble, stepping, Scrubbing, Swing, Rolling, Filter ation, तसेच whirlpool मध्ये सॉफ्टमूव टेक्निकचा वापर केला आहे. आणि हे फ्रंट लोडर मध्ये समावेश होतो. हि टेक्निक ड्रमवर पडणाऱ्या लोडच्या आधारावर काम करते. त्याच्या नुसार आपल्या हालचाली बदलत असते. याच्या आधारावरच फॅब्रिकच्या टाईपची निश्चित होते. जी Energetic Wash, Soft cradle, Power Shower,आणि Slow motion टेक्नॉलॉजी आहे.

loading image