Scientific Studies
Scientific Studiessakal

Scientific Studies : मृत्यूवेळी व्यक्तीच्या डोक्यात काय सुरू असतं? शास्त्रज्ञांनी शोधून काढलं...

मृत्यूवेळी नेमकं काय घडतं, हे आजवर कुणाला ठाऊक नाही.

Scientific Studies : मृत्यूनंतर माणसाचं आयुष्य संपतं, असा सर्वसाधारण लोकांचा समज आहे. कारण मृत्यूनंतर काय होतं, हे कुणालाच ठाऊक नाही. असं म्हणतात की मृत्यू समोर असताना काही लोकांना त्याची जाणीव होते, पण हे कितपत खरं आहे? हेही तितकचं महत्त्वाचं आहे. असे अनेक दावे केले जातात की मृत्यूपूर्वी लोकांना यमराज दिसतो, स्वर्गाचा दरवाजा दिसतो किंवा देव देवता दिसतात पण मृत्यूवेळी नेमकं काय घडतं, हे आजवर कुणाला ठाऊक नाही.

आता काही शास्त्रज्ञांनी मृत्यूवेळी व्यक्तीच्या डोक्यात काय सुरू असतं? हे शोधून काढलंय. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (What Happens to a Persons Body After Death Scientific Studies and Research)

मृत्यूवेळी व्यक्तीच्या डोक्यात काय सुरू असतं? याचं संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञांनी चार रुग्णांवर एक प्रयोग केला. या चार रुग्णांचा मृत्यू हार्ट अटॅकनी झाला होता. मात्र त्यांच्या मेंदूमध्ये होणाऱ्या इलेक्ट्रिक अॅक्टिविटीला इलेक्ट्रोएन्सेफलोग्राम (ईईजी) द्वारा गणल्या जात होते.

चारही रुग्ण कोमामध्ये होते. कोणताही रिस्पॉन्स देत नव्हते आणि जेव्हा मेडिकल मदतीद्वारे त्यांना ठिक करण्याचे प्रयत्न संपले तेव्हा त्यांच्या कुटूंबाच्या परवानगीने त्यांची लाइफ सपोर्ट सिस्टम बंंद करण्यात आली. जेव्हा वेंटीलेटर हटविण्यात आले त्यानंतर त्या लोकांची गामा अॅक्टिविटी वाढली आणि हार्ट रेटही वाढले.

गामा वेव अॅक्टिविटीला ब्रेनमध्ये सर्वात फास्ट मानले जाते. असं म्हणतात की अॅक्टीवीटी चेतनाशी संबंधीत असते. या दोघांनादौरा पडला होता मात्र त्यांच्या मृत्यूच्या एक तासापूर्वी असं काहीही झाले नाही.

बाकी दोन रुग्णांच्या हार्ट रेट वाढला नाही आणि ब्रेन अॅक्टीवीटीही वाढली नाही. असाच एक प्रयोग दहावर्षापूर्वी प्राण्यांवर करण्यात आला होता. कार्डियक अरेस्टनंतर ऑक्सिजन कमी होण्यामुळे व्यक्ती आणि प्राणी दोघांच्या निष्क्रिय होणाऱ्या ब्रेनमध्ये गामा अॅक्टिवेशनला रिकॉर्ड केले.

ही स्टडी खूप कमी लोकांवर करण्यात आली. त्यामुळे यासंबधीत दावे करण्यात शास्त्रज्ञ विचार करत नाही. त्यांच्यामते हे माहिती करणे खूप आहे कारण रुग्णांचा काय अनुभव होता, हे सांगण्यासाठी ते जीवंत सुद्धा नाही.

त्यांच्यामते, खूप मोठ्या स्तरावर अभ्यास केल्यास आपल्याला योग्य रिझल्ट मिळू शकतो. यामुळे गामा अॅक्टीवीटीमध्ये होणारी हालचाल मृत्यूपूर्वी व्यक्तीच्या डोक्यात काय सुरू असतं, हे सांगू शकते. या स्टडीमध्ये समोर आलेले रिझल्ट जर्नल प्रोसिडिंग्स ऑफ द नेशनल अॅकेडमी ऑफ साइंसजमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com