Digital Footprints : फोटो, मेसेज, सोशल मीडिया...मृत्यूनंतर तुमच्या डिजिटल फुटप्रिंटचं काय होतं? असं करा सुरक्षित

Digital Footprints : आपल्या मृत्यूनंतर सोशल मीडिया, फोटो, अकाउंट्स यांचं काय होतं याचा विचार केलाय का? डिजिटल ओळख योग्य पूर्वतयारी केल्यास आपल्या आठवणी व संपत्ती सुरक्षित राहू शकतात.
Digital Footprints
Digital Footprintsesakal
Updated on

Digital Footprints : आपण जिवंत असताना अनेक डिजिटल गोष्टींचा उपयोग करतो. सोशल मीडियावर पोस्ट करतो, फोटो-व्हिडिओ अपलोड करतो, म्युझिक लायब्ररी साठवतो, डिजिटल बँकिंग करतो किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करतो. पण आपण मेल्यानंतर या सगळ्यांचे काय होते? भौतिक संपत्ती तर मृत्यूनंतरही असते, पण या डिजिटल संपत्तीचं काय?

डिजिटल वारसा म्हणजे काय?

डिजिटल वारसामध्ये दोन प्रमुख गोष्टींचा समावेश होतो डिजिटल संपत्ती आणि डिजिटल अस्तित्व.
डिजिटल संपत्तीमध्ये आर्थिक मूल्य असलेले घटक येतात जसे की क्रिप्टो वॉलेट्स, ब्लॉग्ज, यूट्यूब चॅनेल, ऑनलाइन स्टोअर्स, वेबसाइट्स. तर डिजिटल ओळखमध्ये सोशल मीडिया अकाऊंट्स, फोटो, व्हिडिओ, ईमेल्स, चॅट थ्रेड्स, संगीत प्लेलिस्ट्स यांचा समावेश होतो

अनेकदा मृत व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाऊंट्स, क्लाउड स्टोरेज, किंवा म्युझिक अ‍ॅप्सची लॉगिन माहिती न मिळाल्याने त्यांचं डिजिटल अस्तित्व गमावलं जातं. काही कंपन्या मृत्यूपश्चात डेटा वापरण्याचे पर्याय देतात. उदा. फेसबुकचा Legacy Contact, गुगलचा Inactive Account Manager, अ‍ॅपलची Digital Legacy सुविधा. पण बहुतांश लोकांनी हे पर्याय पूर्वीच सेट केलेले नसतात.

Digital Footprints
Byju's अडचणीत! गुगल प्ले स्टोअरवरून अ‍ॅप गायब, मोठा फ्रॉड केल्याप्रकरणी कंपनीवर कारवाई? नेमका विषय काय..जाणून घ्या

काय करायला हवं?

  1. डिजिटल ओळख तयार करा – कोणते अकाऊंट्स जपायचे, कोणते डिलीट करायचे, हे स्पष्ट लिहून ठेवा.

  2. पारदर्शक नोंदी ठेवा – सर्व डिजिटल खात्यांची यादी, युजरनेम्स, आणि पासवर्ड्स एका सुरक्षित ठिकाणी नोंदवा.

  3. डिजिटल एक्झिक्युटरची नेमणूक करा – जो तुमच्या डिजिटल इच्छांची पूर्तता करेल.

  4. पासवर्ड मॅनेजर वापरा – सुरक्षित आणि शेअर करता येईल असा उपाय.

कायदेशीर व तांत्रिक अडथळ्यांमुळे मृत व्यक्तीच्या खात्यांमध्ये प्रवेश मिळवणं अवघड जातं. अनेक प्लॅटफॉर्म्स वापरकर्त्याचा मृत्यू झाल्यानंतर अकाऊंट डिलीट करणं किंवा मेमोरिअलाइज करणं यापुरताच मर्यादित उपाय देतात.

Digital Footprints
iPhone 16 Discount Offer : खुशखबर! iPhone 16 स्मार्टफोनवर मिळतोय 42 हजारचा डिस्काउंट; पण असेल फक्त एकच अट, इथे करा खरेदी

डिजिटल ओळखसाठी अजूनही कोणतंही ठोस आंतरराष्ट्रीय धोरण नाही. यामुळे वैयक्तिक अधिकार आणि कॉर्पोरेट नियंत्रण यामध्ये तणाव वाढतो आहे. त्यात AI जनरेटेड अवतार, पोस्टह्युमस मेसेजेस यांसारख्या नव्या गोष्टींनी नैतिक आणि कायदेशीर प्रश्नही निर्माण केले आहेत.

ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतातही लवकरच याबाबत जनजागृती आणि कायदेशीर दिशा ठरवणं गरजेचं ठरतंय.

जसं आपण आपली मालमत्ता जपतो, तसंच डिजिटल आयुष्यही नियोजित आणि संरक्षित ठेवण्याची आता वेळ आली आहे. मृत्यूनंतरसुद्धा आपली ओळख आणि आठवणी सुरक्षित राहाव्यात, यासाठी 'डिजिटल ओळख' ही काळाची गरज ठरतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com